भारतात फिरायला आलेली ती तरुणी २४ तासात गेली परत, वाचा काय घडले तिच्या सोबत

भारताची विविधता बघयला अनेक लोक परदेशातून येतात. ईस्थर डीलेयू नावाची युवती बेल्जिअम येथून भारत दर्शन करायला नुकतीच आली होती. परंतु २४ तासात तिच्या सोबत अश्या घटना घडल्या कि ती भारत सोडून गेली. तिच्या सोबत घडलेले प्रसंग वाचले तर आपल्याला वाटेल कि ” अतिथी देवो भव” म्हणणारी आपली संस्कृती खरच हरवली आहे का ?

या गोष्टीचा खुलासा तिने बेल्जीअम दूतावास मध्ये केला आणी त्यांनी विदेश मंत्रालयाकडे याची तक्रार नोंदवली आणि त्यानंतर पोलीसा कडे विदेश मंत्रालयाने तक्रार नोंदवली. घटना ६ डिसेम्बरची ईस्थर डीलेयू बेल्जियम वरून दिल्लीला आली. ४ वाजता दिल्ली येथे येताच तिने एक फोन आणि सिमकार्ड खरेदी केले. एक आटो भाड्याने करून ती मिंटो रोड कडे जायला निघाली. परंतु आटो वाला तिला मिंटो रोडला न नेता कुठल्या तरी पार्किंग मध्ये घेऊन गेला.

तिथे त्यांनी त्या महिलेस सांगितले कि आपल्या हॉटेल बाहेर मोर्चा आलेला आहे त्यामुळे पोलिसाच्या परवानगी शिवाय आपण हॉटेल मध्ये जाऊ शकणार नाही. त्यानंतर तो आटो वाला पोलीस स्टेशन म्हणून तिला एका ठिकाणी घेऊन गेला जिथे ६ लोक पोलिसाच्या वर्दीत हजर होते. त्यानंतर तिला मोबाईल मध्ये एक व्हिडीओ दाखविण्यात आला ज्या मध्ये एक मोठा मोर्चा तिला दिसला.

त्या ६ पोलीसापैकी एका महिलेने तिचे दागिने काढून घेतले आणि तिला सांगितले कि तू अशी बाहेर गेल्यास तुझे बोट लोक कापून टाकतील. आणि परत तिला आटो मध्ये बसवून सेन्ट्रल दिल्ली ला पाठविण्यात आले. आणि तिची मिंटो रोडच्या हॉटेल ची बुकिंग कैंसल केलेली आहे. त्यानंतर ती नवीन हॉटेलला आली. तिसऱ्या माळ्यावर असलेली तिच्या रूमला खिडकी सुध्दा नव्हती.

तिच्या लक्षात आले कि तिच्या सोबत काहीतरी वेगळे होणार तिने स्वतःला रूम मध्ये लॉक करून घेतले त्यानंतर अनेक वेळा तिचा दरवाजा वाजला पण तिने तो उघडला नाही. तेवढ्यात तिने घेतलेले सीम कार्ड सुरु झाले आणि भारतात तिचा मित्र एक ऋषिकेश फिरायला आला होता त्याला फोन केला आणि त्या मित्राने तिच्या जुन्या हॉटेलला फोन केला.

तेव्हा तिला कळले कि तिची फसवणूक झाली आहे कुठलाही मोर्चा सुरु नाही आहे. आणि तिची बुकिंग सुध्दा कैंसल नाही झाली आहे. त्यानंतर तिच्या जुन्या हॉटेलचा एक कर्मचारी तिला घेण्यास आला आणि ती रात्रभर त्या हॉटेल मध्ये थांबून सकाळी बेल्जियमला परत गेली.

त्यांतर विदेश मंत्रालया द्वारे तिला फसविणाऱ्या आटोवाला, पर्यटक एजन्सी आणि खोटे पोलीसवाले इत्यादी बेनावी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परंतु भारतात तिच्या देशातून लोक येताना आता नक्की १० वेळेस विचार करणार.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *