या कारणामुळे अक्षय कुमार आणि शाहरुख दोघांनी ३० वर्षात एकही चित्रपट सोबत केला नाही..

मागील ३० वर्षापासून शाहरुख आणि अक्षय कुमार दोघे सिनेसृष्टीत काम करत आहे. एक बॉलीवूडचा बादशाह तर एक बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जातो. शाहरुख वर्षाला एखादा चित्रपट करतो तर अक्षयचे ४-५ चित्रपट वर्षभरात येतात. काही दिवसाखाली झालेल्या मुलाखातीत शाहरुख ला प्रश्न विचारण्यात आला कि तू अक्षय सोबत काम का करत नाही ?

शाहरुख ने या प्रश्नाचे उत्तर टाळले आणि असेच उडवाउडवीचे उत्तर दिले. तो बोलतो कि ” मी या विषयी काय बोलू शकतो. जेव्हा अक्षय कुमार उठतो तेव्हा मी झोपतो. जेव्हा मी सेटवर जाणार तेव्हा अक्षयचे काम संपलेले असेल आणि तो घरी जाण्याच्या तयारीत असेल. कारण त्याला दुसर्या दिवशी लवकर दिवस सुरु करायचा असतो. मी रात्री काम करणारा माणूस आहे. प्रत्येक व्यक्तीला माझ्या प्रमाणे रात्री काम करायला आवडत नाही. परंतु अक्षय सोबत काम करायला मला आवडेल फक्त आमचा टायमिंग जुळत नाही.”

अश्या प्रकारे उत्तर देऊन शाहरुख ने तो प्रसंग टाळला. आपल्याला हि गोष्ट पटणार नाही परंतु सलमान सुध्दा हेच कारण सांगतो सलमान आणि अक्षयने मुझसे शादी करोंगी, जानेमन हे चित्रपट सोबत शूट केले आहे. सलमान सांगतो कि मी जेव्हा सेट वर पोहचत असे तेव्हा अक्षय कुमार आपले सीन शूट करून परत जाण्याच्या तयारीत राहत होता.

अनेक सीन दोघांनी वेगवेगळे शूट केले आहे. एका फ्रेममध्ये दोघांना फार कमी सीन देण्यात आले होते. सर्व इंडस्ट्रीला माहिती आहे कि अक्षय ला वेळेवर काम करणे आवडते. तो लवकर झोपतो आणि लवकर उठतो. दारू, सिगारेट असे व्यसन त्याला नाही आहे. या कारणा मुळे सलमान शाहरुख वर्षातून एक सिनेमा पूर्ण करतात आणि अक्षय कुमार ४,५ सिनेमे पूर्ण करतो.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचेह पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *