प्रियांका गांधींनंतर गायकवाड राजघराण्याची हि राजकुमारी सुद्धा होणार राजकारणात सक्रिय!

बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याची राजकुमारी प्रियदर्शिनी सिंधिया या ग्वालियरच्या राजघराण्याच्या सून आहेत. त्यांचे पती ज्योतिरादित्य सिंधिया हे प्रचंड लोकप्रिय नेते आहेत. त्यांचे वडील माधवराव सिंधिया यांच्या निधनानंतर ते सक्रिय राजकारणात आले. ज्योतिरादित्य हे राहूल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

नुकतेच प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात आल्या. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रियांका नंतर आता प्रियदर्शिनी या देखील सक्रिय राजकारणात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नुकत्याच झालेल्या मध्ये प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. १५ वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेससाठी हा ऐतिहासिक विजय होता. यामध्ये प्रियदर्शीनी यांचे पती ज्योतिरादित्य यांचा सिंहाचा वाटा होता. प्रियदर्शिनी या गायकवाड राजघराण्याच्या राजकुमारी आहेत. त्या कधी सक्रिय राजकारणात येते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

खासरेवर जाणून घेऊया प्रियदर्शिनी यांच्याविषयी-

प्रियदर्शिनी या बडोद्याच्या कुमार संग्रामसिंह गायकवाड यांच्या कन्या आहेत. संग्रामसिंह हे बडोद्याचे शेवटचे शासक प्रतापसिंह गायकवाड यांचे पुत्र आहेत. तर प्रियदर्शिनी यांची आई नेपाळच्या राजघराण्यातून आहे.

प्रियदर्शिनी यांनी मुंबईच्या फोर्ट कॉन्व्हेंट स्कुलमधून शिक्षण घेतले आहे. २०१२ साली झालेल्या फेमिना अवार्डमध्ये प्रियदर्शिनी यांनी जगातील ५० सर्वात सुंदर महिलांमध्ये देखील स्थान मिळवलेले आहे. ज्योतिरादित्य आणि प्रियदर्शिनी यांना महाआर्यमान आणि अनन्यराजे हि २ मुलं आहेत.

प्रियदर्शिनी आणि ज्योतिरादित्य यांची पहिली भेट १९९१ मध्ये झाली होती. ज्योतिरादित्य यांना पहिल्याच भेटीत त्यांच्यावर प्रेम झाले होते. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटायचे. १२ डिसेंबर १९९४ ला दोघांचे लग्न झाले.

१४०० कोटींच्या राजवाड्यात राहते हि राजकुमारी-

केंद्रात जेव्हा मनमोहन सिंग यांचे सरकार होते तेव्हा २ वर्षे प्रियदर्शिनी यांचे पती ज्योतिरादित्य हे केंद्रीय मंत्री देखील राहिले आहेत. राजकुमार असल्याने त्यांची संपत्ती आणि जीवनशैली स्वप्नवत आहे. ते ४०० खोल्यांच्या शाही राजवाड्यात राहतात. १८७४ मध्ये युरोपियन शैलीत या जयविलास पॅलेसची निर्मिती करण्यात आली होती. ४० खोल्या या म्युझियम असून सिलिंगला सोन्याचा मुलामा आहे.

ज्योतिरादित्य यांनी १९९३ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून इकॉनॉमीची डिग्री मिळवली आहे. पुढे त्यांनी २००१ मध्ये स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कुल ऑफ बिझनेस मधून एमबीएची डिग्री पण मिळवली. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ४ वर्षे अमेरिकेत काम देखील केले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *