महात्मा गांधीचा हत्यारा नथुराम गोडसेच्या अस्थीचे का नाही करण्यात आले विसर्जन..

हिंदू धर्मात मृत्यू नंतर अस्थी विसर्जन हा एक परंपरेचा भाग आहे. एखाद्या व्यक्तीस अग्नी दिल्या नंतर लोक तिचे विसर्जन आप आपल्या ऐपती नुसार विविध ठिकाणी करतात. गंगा नदीत अस्थी विसर्जन पवित्र मानल्या जाते. मृत आत्म्यास शांती आणि मोक्ष प्राप्ती करिता अस्थी विसर्जन केल्या जाते. परंतु नथुराम गोडसे यांच्या अस्ठीचे ७० वर्षापासून विसर्जन केले नाही आहे.

नथुराम गोडसे हे नाव भारताच्या इतिहासासोबत जोडलेले आहे. कारण गांधी हत्या अनेक हिंदुत्ववादि संघटना या हत्येचे समर्थन करतात. नुकताच एक व्हिडीओ सुध्दा वायरल झाला आहे ज्यामध्ये ३० जानेवरी महात्मा गांधी पुण्यतिथीस गांधीजीच्या पुतळ्यास गोळ्या मारताना काही हिंदुत्ववादि संघटनेचे पदाधिकारी आहेत.

फाळणीला गांधीजींना जवाबदार धरून त्यांनी हत्या केली असे कारण अनेक संघटना सांगतात परंतु याच संघटना मार्फत फाळणीच्या आधी अनेक वेळा गांधीजीवर जीवघेणा हल्ला केलेला आहे हे इतिहासात नमूद आहे. भारताच्या फाळणी नंतर झालेला हिंसाचार आणि त्यामुळे घडलेल्या धार्मिक दंगली ह्या सर्वांनाच माहिती आहे. जगातील सर्वात मोठी फाळणी हि भारत पाकिस्तानची फाळणी होती.

पाकिस्तानीतील हिंदूच्या मृतदेहाचे खच असलेल्या अनेक रेल्वे भारतात त्या काळात आल्या होत्या. ३० जानेवारीला सायंकाळी ५ वाजून १५ मिनटाने प्राथनेस जात असताना नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीजीवर हल्ला केला यात त्यांचा मृत्यू झाला. या नंतर नथुराम गोडसे ला फाशीची शिक्षा सुनविण्यात आली आणि त्याला फाशी देण्यात आली.

पुणे राहणाऱ्या हिमानी सावरकर सांगतात कि नथुराम गोडसे यांच्या फाशी नंतर त्यांचा देह परिवारास देण्यात नाही आली. तर त्यांच्या अस्थी त्यांना देण्यात आल्या. परंतु गोडसे यांची एक अंतिम इच्छा सांगितली होती त्यामुळे त्यांच्या परिवाराने त्यांच्या अस्थिचे विसर्जन केले नाही आहे. त्यांची अंतिम इच्छा पुढील प्रमाणे होती.

त्यांनी सांगितले आहे कि, जो पर्यंत स्वतंत्र भारतात सिंधू नदी येत नाही जुना अखंड भारत तयार होत नाही तो पर्यंत माझ्या अस्ठीचे विसर्जन करू नका. याच कारणामुळे अस्थी विसर्जन ७० वर्ष लोटूनही झाले नाही आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *