मितेश जाधव नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली तर तुमचे फेसबुक अकाउंट हॅक होते?

सोशल मीडियावर कोणती गोष्ट वायरल होईल ते सांगता येत नाही. अफवा चुकीची माहिती शहाणी समजली जाणारी लोक ही बिनधास्तपणे फॉरवर्ड करताना दिसतात. आता दोन दिवस झाले. फेसबुक व्हाट्सअप्प वर मितेश जाधव बद्दल मेसेंज व्हायरल होत आहेत. ते मेसेंज सर्वजण एकमेकाला पाठवत आहेत. या मितेश जाधव प्रकरणाची आम्ही पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आले ते पहा..

मितेश जाधव बद्दल काय मेसेंज पाठवला जातोय ते अगोदर आपण पाहूया.. “मितेश जाधव नावाच्या व्यक्तीने तुम्हाला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली तर स्वीकारू नका.हा एक न्यू हॅकर आहे. तुमच्या fb अकाउंट ला जितके फ्रेंड्स आहेत त्या सर्वांना हा massege फॉरवर्ड करा. नाहीतर एका फ्रेन्ड नी पण फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारली तर तुमचे आणि तुमच्या सर्व फ्रेंड्स चे fb अकाउंट hack होऊन जाईल. फ्रेन्ड म्हणून तुमच्या सर्व मित्रांना send करा
Plz be serious” हा मेसेंज सर्रास पाठवला जातोय..

या मेसेंज मध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही हा मेसेंज निव्वळ खोडसाळपणा चा प्रकार आहे. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि स्वीकारली तर तुमचे आणि तुमच्या मित्राचे प्रोफाइल हॅक करणे शक्य नसते. फेसबुक वर मोठ्या प्रमाणावर फिशिंग वेबसाईट द्वारे हॅकर हॅकिंग करताना दिसतात..

जे लोक पॉर्न च्या लोटरीच्या लालचेने कोणत्याही लिंक वर क्लिक करतात त्यांचे अकाउंट हॅक होऊ शकतात.. कोणाला तरी एड् केले तर फेसबुक हॅक होईल असे नसते. फक्त कधी आपली व्यक्तिगत माहिती चोरून हॅकिंग करण्याचा प्रयत्न होऊ शकतो..

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेंज मध्ये कोणतेही तथ्य नाही. मितेश जाधव नावाचे भूत तयार करून लोकांच्या मनात भीती तयार करायचा प्रयत्न केला जातोय..

हा मेसेंज व्हायरल झाल्यानंतर आपल्या मित्रांची खेचायला काही महाभागांनी तर मितेश जाधव नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मित्रांना अजून भीती घालायचा प्रयत्न सुद्धा केलाय.. असे फेक मितेश जाधव रात्रीतून तयार झाले आहेत. तरी आमचे एकच सांगणे राहील अनोळखी व्यक्तीला ऍड करतांना सावधगिरी बाळगत जा.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *