जैन सन्यासी साध्या आयुष्याचा कठीण मार्ग..

जैन धर्म हा भारतातील एक वैभवशाली वारसा असणारा धर्म म्हणून पाहिल्या जातो. आज या धर्मातील लोक सर्वात श्रीमंत आहेत. अनेक व्यवसायात जैन धर्मियांचे वर्चस्व आहे. जैन धर्म हा अहिंसा या मुख्य तत्वावर आधारला आहे.जैन धर्मात सत्य,अहिंसा, अस्तेय(चोरी करू नये),अपरिग्रह( संपत्ती संग्रह करू नये),ब्रम्हचर्य या पंचमहाव्रताला महत्व आहे. या धर्मात यती, उपसक व श्रावक असे भेद आहेत. यती म्हणजे संसाराचा त्याग करून विरक्त होणे.

जैन धर्मात साधू साध्वी होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते व ही दीक्षा घेतल्यानंतर अत्यंत कडक जीवन व्यथित करावे लागते. दीक्षा घेतल्या नंतर 5 महाव्रतांचे त्यांना पालन करावे लागतात सोबतच त्यांना एका मोठ्या त्रासदायक गोष्टीला सामोरे जावे लागते. ते म्हणजे दीक्षा घेतल्यावर डोक्यावरील केस काढण्याचा विधी.

आता हा विधी साधा सुधा नाही दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीचे केस कोणत्याही साधनाने कापले जात नाहीत तर ते केस हाताने उपटून काढून टक्कल केले जाते. याला केश लोंच असे म्हटले जाते. प्रत्येक साधूला या प्रक्रियेतून जावेच लागते. दीक्षा घेतल्यानंतर साधू साध्वी यांना सूर्यास्त नंतर अन्नपाणी चा एक दाना ही ग्रहण करू शकत नाहीत. सूर्योदय झाल्यानंतर 48 मिनिटांनी त्यांना पाणी घेता येऊ शकते.

तसेच जैन मुनी हे स्वतः साठी जेवण बनवू शकत नाहीत. त्यांना जेवण घेण्यासाठी भिक्षा मागून आपल्या जेवणाची सोय करावी लागते. तसेच एका घरातून भरपूर असे जेवण घेता येत नाही थोडकेच जेवण भिक्षेत घ्यावे लागते.याला गोचरी असे म्हणतात. जेवण घेण्यासाठी ही ते कोणत्या विशेष पात्राचा उपयोग करत नाहीत त्यांना ओंजळीत अन्न ग्रहण करावे लागते. ओंजळीत जर मुंगी केस, काही अपवित्र गोष्ट आली तर ते जेवण घेणे बंद करतात.व पाणी पण पीत नाहीत.

जैन मुनी कोणत्याही प्रकारचे प्रवासासाठी साधन वापरू शकत नाही.हजारो किलोमीटरचा प्रवास ते बिना चप्पल बूट अनवाणी पायानेच करतात.तसेच एकाच ठिकाणी जास्त वेळ ते थांबू पण शकत नाहीत. पावसाळ्यात 4 महिने ते प्रवास करू शकत नाहीत.यापाठीमागे रस्त्यातील जीव जंतू पायाखाली येऊ नयेत अशी भावना असते.

मोक्षाकडे जाण्यासाठी सन्यास हा मार्ग जैन धर्मात सांगितला आहे. त्यामुळे आई वडील यांची परवानगी घेऊन दीक्षा घेतल्या जाऊ शकते. तसेच स्त्रीला दीक्षा घेण्यासाठी पती वा वडिलांची परवानगी घ्यावी लागते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *