टेल्को कंपनीत 15 ते 20 रुपये महिन्यांनी नोकरी करणारे भाटकर ते प्रसिद्ध अभिनेता

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तरुण दिसणारं व्यक्तिमत्व म्हणून रमेश भाटकर यांचा परिचय आहे. मराठी व हिंदी सिने सृष्टी मध्ये ते कार्यरत राहिले आहेत. रमेश भाटकर हे सिरीयलच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले व्यक्तिमत्व आहे. पण रमेश भाटकर हे वेगळ्या वर्तुळातून सिने सृष्टीमध्ये पोहचले आहेत.

टेल्को या कंपनीत 15 ते 20 रुपये महिन्यांनी नोकरी करणारे भाटकर ते प्रसिद्ध अभिनेता असा त्यांचा संघर्षपूर्ण प्रवास आहे. रमेश भाटकर यांना तसा सिनेसृष्टीतील वारसा आहे. त्यांचे वडील स्नेहल भाटकर हे संगीतकार होते. मुलाने ही संगीताकडे वळावे यासाठी त्यांनी रमेश भाटकर यांना संगीत शाळेत पाठवले पण भाटकर त्यशाळेत जाऊन झोपायचे.

तेथून त्यांना तबला वादनाचे क्लास लावले पण तिथे ही त्यांनी त्यात रस दाखवला नाही. म्हणून त्यांना वाटले की हा काही आपल्या क्षेत्रांत येत नाही. त्यांना रेग्युलर शिक्षण सुरू होते. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी टेल्को कंपनी मध्ये जॉब करायला सुरुवात केली.तिथे जॉब करताना ते हॉस्टेल वर राहायचे तर त्याठिकाणी त्याकाळात रिडिओ वर लागणाऱ्या गाण्यावर ते आणि त्यांचे मित्र नाच करायचे हे पाहून तेथील सुहास वागज यांनी उद्योगिक कला संमेलनात नाटक बसवतोय त्यात तुम्ही भूमिका करता का हे विचारले पण भाटकर यांनी टाळले नंतर त्यांनी बराच फोर्स केल्यावर त्यांनी ते नाटक केले आणि त्या स्पर्धेत प्रथम बक्षीस जिंकले.येथून त्यांच्या नाट्य जीवनाला सुरुवात झाली.

हळू हळू नाटक सिरीयल मध्ये काम करत ते टेल्को चा जॉब सुद्धा करायचे . त्यांना हॅलो इन्स्पेक्टर व कमांडर या सिरीयल च्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.त्यानंतर त्यांनी पाठीमागे वळून पाहिले नाही. आज मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक यशस्वी चित्रपट त्यांच्यानावावर आहेत. आज ते सत्तरी मध्ये हे तरुण दिसायचे.

त्यांना कॅन्सर चे निदान झाल्यानंतर त्यांनी आपले आयुष्य कमी राहिले आहे हे जाणून सिनेसृष्टीत पुन्हा ऍक्टिव्हली काम सुरू केले होते. त्यांचा शेवटचा चित्रपट हा अकसिडेंटल प्राईम मिनिस्टर हा असेल. त्यात त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका केली आहे..

या महान अभिनेत्यास खासरे कडून भावपूर्ण श्रद्धांजली..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *