“एक अनपेक्षित घटना आणि मी माझं कर्तव्य पुर्ण केलं”.. शाब्बास लावाण्या

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हि घोषणा आपण अनेकदा ऐकतो आणि बोलतो. पण खरं बघायला गेलं तर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अशा घोषणा देऊन देशव्यापी मोहीम राबविण्यात येत असली आणि महिलांच्या कर्तृत्वाच्या गाथा कितीही गायल्या, तरी भारतात मुलीच्या जन्माचे स्वागत होत नाहीच. मुली प्रत्येक क्षेत्रात आज आघाडीवर आहेत. पण मुली या का नकोश्या होतात हे कळायला मार्ग नाही.

मागील काही वर्षात मुली नकुशा असण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. मुलींच्या जन्माचे स्वागतही अनेकजण करत आहेत. पण अधून मधून अशी एखादी घटना समोर येते ज्यातून पुन्हा यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. आपल्या स्वार्थापोटी लोकं चिमुकल्या अर्भकाला कुठेही फेकून देतात.

काल अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. एका अवघ्या ३-४ दिवसाच्या अर्भकाला झाडं दगडात फेकून देण्यात आले. पण इथे एका मुलीलाच तिची दया आली आणि तिने त्या अर्भकाला जीवनदान दिले. पुण्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लावाण्या शिंदे यांनी हि घटना अनुभवली आणि आपले कर्तव्य पूर्ण केले.

लावाण्या या काल संध्याकाळी आपल्या विमाननगर येथील हॉटेलमध्ये बसलेल्या होत्या. त्यावेळी त्यांना त्यांच्या भावाचा कॉल आला, WNS कंपनीच्या मागील झाडा-दगडात एका ४-५ दिवसाच्या अर्भकाला कोणीतरी फेकून दिल्याची माहिती भावाने त्यांना दिली. ते ४-५ दिवसाची मुलगी खुप रडत होती. लावाण्या यांनी तात्काळ तिथे धाव घेतली.

त्यांनी त्या मुलीला आपल्या ताब्यात घेतले आणि येरवडा पोलिसांना याविषयी माहिती दिली. सोबतच ऍम्ब्युलन्सदेखील तोपर्यंत बोलावून घेतली. त्यानंतर ससूनमध्ये त्या अर्भकाला त्या घेऊन गेल्या आणि सर्व चेकअप करून घेतले. लावाण्या यांनी त्या अर्भकाला श्रीवत्स सोफोश अनाथ आश्रमात ठेवले आहे.

पोलीस पुढील तपास करत आहेत. पण येथे प्रश्न पडतो कि त्या मुलीला फक्त एक मुलगी असल्यामुळे फेकून देण्यात आले आहे का?

मनसैनिक असलेल्या लावण्या त्या अर्भकाचे आईवडील नाही सापडले तर त्याचा सांभाळ करनार आहेत. त्यांनी त्या चिमुकलीला वीरा नाव देखील दिले आहे. लावण्या यांना या विषयी विचारले असता त्यांनी वीराचे आयष्य सुखी होवो हि सदिच्छा व्यक्त केली. आणि त्यांना यामध्ये मदत रणजित शिरोळे आणि रुपाली ठोंबरे यांनी मदत केल्याचे सांगितले.

-लावाण्या शिंदे(९८८१०१८८७६)

लावाण्या शिंदे यांना पुढील सामाजिक कार्यासाठी खासरेकडून शुभेच्छा. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *