या व्यक्तीला जाते शरद पवारांचा कॅन्सर बरा करण्याचे श्रेय..

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दुर्धर कॅन्सर आजाराने ग्रासले होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांना कॅन्सर झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. ४० वर्षांपूर्वी तंबाखू आणि सुपारीच्या जीवघेण्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांना या आजाराचा सामना करावा लागला. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते.

त्यावेळी डाॅक्टरांनी त्यांना ३६ वेळा रेडिएशन ट्रिटमेंट घ्यायला सांगितली होती. एवढेच नाही तर डाॅक्टरांनी त्यांना फक्त सहा महिन्यांचा कालावधी दिला होता. तुमची जी काही कामे असतील ती लवकर उरकून घ्या असे डॉक्टर पवारांना म्हणाले होते. यावर पवारांनी मला आजाराची चिंता नाही तुम्हीही करू नका असे सांगितले होते. हेच शब्द आज त्यांनी खरे करून दाखवले आहेत. जीवघेण्या कॅन्सर च्या रोगावर मात करून नव्या जोमाने आयुष्य जगण्यास सुरुवात केली आहे.

अतिशय जिद्दीने पवार यांनी या आजारावर मात केली आहे. पण त्यांच्या या जिद्दीसोबत त्यांचा कॅन्सर बरा करण्याचे श्रेय एका व्यक्तीला जाते. ती व्यक्ती आहे मुंबई येथील प्रिन्स अली खान रुग्णालयाचे प्रख्यात आॅन्कोलाॅजिस्ट सुलतान ए. प्रधान. डोके व मान यांवरील कॅन्सरच्या शस्त्रक्रियांसाठी डाॅ. प्रधान यांची जगभरात ख्याती आहे. शरद पवार यांच्यावर त्यांनीच खूप कौशल्याने महत्वाच्या शस्त्रक्रिया केल्या होत्या.

शरद पवार हे कॅन्सरच्या रुग्णांसाठी आता एक रोल मॉडेल बनले आहेत. ते २०२२ पर्यंत त्यावर पूर्णपणे मात करतील असा डॉक्टरांना विश्वास आहे. नुकतेच डॉ. ए प्रधान यांना धन्वंतरी पुरस्काराने शरद पवारांच्या हस्ते गौरविण्यात आले.

डॉ. ए प्रधान आहेत कॅन्सरच्या रुग्णासाठीचे आशास्थान-

डॉ. ए प्रधान यांनी एका सध्या रुग्णालयाचे रुपांतर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये केले आहे. त्यांच्या या रुग्णालयात दरवर्षी जवळपास ४०००० रुग्ण कॅन्सरवर उपचार घेतात. त्यातील २-३ हजार शस्त्रक्रियांमध्ये त्यांची मदत घेतली जाते. त्यांच्यामुळे अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *