भारताचा पराभव होईल असे वाटत असतानाच धोनीने पुन्हा एकदा केली कमाल! बघा व्हिडीओ..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज वनडे मालिकेतील शेवटचा सामना झाला. हा सामना भारताने ३५ धावांनी जिंकला. पण एक वेळ अशी आली होती जेव्हा धोनीने चतुराई दाखवली नसती तर भारताचा पराभव देखील झाला असता.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आज चौथ्या सामन्याप्रमाणे पाचव्या सामन्यातही भारताच्या प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकली होती. पण युवा खेळाडू अंबाती रायडू आणि विजय शंकर यांच्या भागीदारीमुळे भारताला न्यूझीलंडसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. भारताने न्यूझीलंडसमोर 253 धावांचे आव्हान ठेवले. हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली.

विराटच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाची सलग दुसऱ्या सामन्यात दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले. रोहित २, शिखर ६, शुभमन ७ आणि धोनी ७ धावांवर बाद भारताच्या ४ बाद १८ अशी दयनीय अवस्था झाली. त्यानंतर फलंदाजीत बढती मिळालेल्या विजय शंकरने रायडूला साथ देत संघाचा डाव सावरला.

रायडू आणि शंकर यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना करत चांगली भागीदारी केली. या दोघांनी 98 धावांची भागीदारी करत संघाचे शतक पूर्ण केले. पण, शंकर अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. तो ४५ धावांवर बाद झाला. केदारने रायडूच्या साथीत अर्धशतकी भागीदारी केली. रायडू शतक पूर्ण करेल असे वाटत असतानाच फटकेबाजीच्या प्रय़त्नात तो ९० धावांवर बाद झाला. अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पंड्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत संघाला अडीचशे पार नेले. पंड्याने २२ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकारांसह ४५ धावा केल्या. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय झाली.

२५३ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या ३ फलंदाज झटपट बाद झाले. पण कर्णधार केन विलियम्सन आणि न्याथमने डाव सावरला. पण केदार जाधवने विकेट काढून भारताला मॅचमध्ये वापस आणले. पण त्यानंतर आलेल्या निशामने जोरदार फटकेबाजी केली. त्याने ३१ चेंडूत ४४ धावा फटकावत मॅचमध्ये वापस आणले.

तो खेळत असताना भारताचा पराभव होईल असे वाटत असतानाच धोनीच्या चलाखीने निशामला रणआऊट केले आणि भारताला विजयाच्या जवळ नेले आणि भारताने हा सामना जिंकला.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *