महाराणी गायत्री देवी: एका राजमाते पेक्षा आहे मोठा यांचा जीवनप्रवास..

सप्टेंबर२०१८ मध्ये बाद्शाहो नावाचा एक सिनेमा आला होता. हा सिनेमा १९७८ आणीबाणीच्या काळातील प्रसंगावर आधारित आहे. यामध्ये सुध्दा महाराणी गायत्री देवीच्या महालावर छापा मारलेला दाखविण्यात आला होता. या काळात सोने चांदीचे अनेक दागिने जप्त करण्यात आले होते. परंतु या अगोदर आपण बघूया महाराणी गायत्री देवी कोण आहेत.

सिनेमात इलियाना डी’क्रूज़ हिचे नाव ‘रानी गीतांजलि देवी’ असे ठेवण्यात आले होते परंतु हे पात्र राणी गायत्री देवी यांच्यावर आधारित होते. महाराणी गायत्री देवी ह्या आपल्या राहणीमान आणि सौंदर्यामुळे सतत चर्चेत राहत होत्या.

गायत्री देवी यांचा जन्म २३ मे १९१९ लंडन त्यांचे वडील बिहार येथील राजा आणि बरोदा येथील राजकुमारी, गायत्री देवीचे बालपण एका शानदार महालात गेले. त्यांचे जवळचे मित्र त्यांना आयशा नावाने ओळखत असे. गायत्री देवीने आपल्या आयुष्यातील पहिली शिकार वयाच्या १२व्या वर्षी केली होती. जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी महाराणी गायत्री देवीचे घर होते.

असे सांगण्यात येते कि गायत्री देवींना महागड्या गाड्यांचा शौक होता. त्यांच्या कडे बरेच महागड्या गाड्या होत्या. काही रोल्स रोयाल्स आणि स्वतचे प्रायवेट विमान देखील राणी गायत्री देवी यांच्या कडे होते. भारतात सर्वात पहिली मर्सिडीज़ बेन्ज़ W126 हि त्यांच्या करिता परदेशातून बोलविण्यात आली होती. त्यानंतर हि गाडी त्यांच्या दुसर्या घरी मलेशिया येथे पाठविण्यात आली.

विदेशातील मैगझीन मध्ये गायत्री देवीच्या सुंदरतेची चर्चा असायची तसेच त्यांचे दागिने देखील येथे प्रसिद्ध करण्यात येत होते. त्यांची ज्वेलरी आणि फ्रेंच शिफॉनच्या साड्या यांच्या करिता अनेक लोक त्यांची प्रशंसा करत होते. अमिताभ बच्चन स्वतः सांगतात कि ते कॉलेज मध्ये असताना गायत्री देवींचे चाहते होते. अनेक वेळेस जयपूर येथील पोलो क्लब येथे अमिताभ बच्चन गायत्री देवींना बघण्याकरिता गेलेले आहे.

गायत्री देवी यांची वयाच्या १२ व्या वर्षी राजा मानसिंह द्वितीय यांच्या सोबत ओळख झाली. आणि वयाच्या १७ व्या वर्षी राजा मानसिंह यांनी गायत्री देवीना लागणा करिता प्रपोज केले. त्यांनी लग्नास होकार दिला परंतु त्यानाही माहिती होती कि राजा मानसिंह यांच्या घरात पडदा प्रथा आणि गायत्री देवी ह्या स्वतंत्र विचाराच्या होत्या.

परंतु त्यांनी जुन्या रूढी परंपरा न जुमानता आपले काम सुरु ठेवले. १९६२ साली चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या ‘स्वतंत्र पार्टी’ तून त्यांनी पहिली निवडणूक लढविली आणि 2,46,516 मतांनी त्या विजयी झाल्या. १९६७ आणि १९७१ मध्ये त्या खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेल्या. आपात काळात त्यांच्या घरात धन लपून आहे हे आरोप लावून त्यांच्या महालावर छापे मारण्यात आले.

राजकारणातून सन्यास घेतल्या नंतर त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र ‘ए प्रिंसेस रिमेम्बर्स’ देखील लिहले. अश्या अनेक चढ उताराच्या आयुष्यात गायत्री देवी आपल्या स्वतंत्र अस्तित्व दाखवत राहिल्या. फक्त सुंदरता नाहीतर चातुर्याने देखील महाराणी गायत्री देवींनी नाव कमविले.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *