धोनी मराठीत केदारला बोलला ‘भाऊ…घेऊन टाक’ ! अन केदार जाधवने घेतली विलियम्सनची विकेट..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज वनडे मालिकेतील शेवटचा सामना झाला. हा सामना भारताने ३५ धावांनी जिंकला. पण एक वेळ अशी आली होती जेव्हा धोनीने चतुराई दाखवली नसती तर भारताचा पराभव देखील झाला असता.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आज चौथ्या सामन्याप्रमाणे पाचव्या सामन्यातही भारताच्या प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकली होती. पण युवा खेळाडू अंबाती रायडू आणि विजय शंकर यांच्या भागीदारीमुळे भारताला न्यूझीलंडसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. भारताने न्यूझीलंडसमोर 253 धावांचे आव्हान ठेवले. हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली.

भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघाला २१७ धावांवर ऑलआऊट केले. भारताने हि मालिका ४-१ ने आपल्या खिशात घातली. भारताने न्यूझीलंडमध्ये तब्बल दहा वर्षांनी वनडे मालिका जिंकली.

धोनीचा मराठी बाणा-

महेंद्रसिंह धोनी यष्टीरक्षण करत असताना आपल्या गोलंदाजांना सतत काहीतरी सल्ले देत असताना आपण आजपर्यंत आपण अनेकदा पाहिलं आहे. अन त्याने दिलेला सल्ला यशस्वी देखील होतो. पण धोनीने आज कमालच केली. त्याने चक्क केदार जाधवला आज मराठीमध्ये सल्ला दिला. धोनी केदारला म्हणाला भाऊ… घेऊन टाक! केदारने देखील धोनीचा मराठीतून सल्ला मनावर घेतला आणि केन विलियम्सनचा मोठा अडथळा दूर केला.

बघा व्हिडीओ-

धोनीने चतुराईने केले रनआऊट-

२५३ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या ३ फलंदाज झटपट बाद झाले. पण कर्णधार केन विलियम्सन आणि न्याथमने डाव सावरला. पण केदार जाधवने विकेट काढून भारताला मॅचमध्ये वापस आणले. पण त्यानंतर आलेल्या निशामने जोरदार फटकेबाजी केली. त्याने ३१ चेंडूत ४४ धावा फटकावत मॅचमध्ये वापस आणले.

तो खेळत असताना भारताचा पराभव होईल असे वाटत असतानाच धोनीच्या चलाखीने निशामला रनआऊट केले आणि भारताला विजयाच्या जवळ नेले आणि भारताने हा सामना जिंकला.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *