आशियातील हि स्वप्नवत ८ बेटं तुम्हाला माहिती आहेत का?

२०१९ मध्ये तुम्ही फिरण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही भारताबाहेर फिरण्यासाठी जाण्याच्या विचारात असाल तर तुम्ही आशियामधील सुंदर बेटांचा विचार करू शकता. आशियामध्ये निसर्ग सौदर्यांनी नटलेली अनेक सुंदर बेटं आहेत. आशियातील शांत बेटांना नक्की भेट द्या. अशाच काही सुंदर बेटांविषयी जाणून घेऊया खासरेवर..

फुकेटचे बेट-

थायलंडमधील फुकेटच्या दक्षिण प्रांतात असलेल्या या बेटावर तुम्हाला ट्रेकिंगचा मनमुराद आनंद घेता येईल. आशियातील हे सर्वात मोठे बेट असून या सोबत ३२ छोटी बेटं आहेत. या बेटावर क्रुजची सफरदेखील करता येते.

पालावान बेट-

फिलिपाईन्समधील पालावान या बेटाला मनमोहक निसर्ग सौंदर्यामुळे आशियाचा स्वर्ग म्हणून ओळखलं जातं. पालावान शांत आणि सुंदर बेट असल्याने अनेक पर्यटक तेथे भेट देत असतात. या बेटाला पर्यटक मोठ्या प्रमाणात पसंती देतात.

बाली बेट-

सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही एकदा तरी या बेटाला नक्की भेट द्या. इंडोनेशियातील बाली हे बेट सर्वात सुंदर बेटांपैकी एक आहे. समुद्रासोबतच येथील प्राचीन मंदिरे जगभरातील लाखो पर्यटकांना आकर्षित करतात. प्राचीन मंदिराबरोबर येथे महाल पाहण्याची ही संधी मिळते.

लांगकावी बेटांचा समूह-

मलेशियातील पश्चिम तटावर असेल्या लांगकावी या ९९ बेटांच्या समूहाला चहुबाजूंनी निळ्याशार समुद्रांनी वेढलेलं आहे. या बेटावर विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येतो.

मॅकलेड बेट-

म्यानमारमधील मॅकलेड हे बेट अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र या ठिकाणी केवळ एकच रिसॉर्ट असल्याने येथे जाण्याच्या प्लॅन असेल तर आधीच बुकींग करावं लागतं. त्यामुळे तुम्ही जायच्या विचारात असाल तर सर्व माहिती अगोदर घेणे आवश्यक आहे.

पोम पोम बेट-

मलेशियातील पोम पोम बेट हे तेथील निसर्ग सौदर्यामुळे अत्यंत प्रसिद्ध बेट आहे. शांत वातावरणात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या बेटाला पसंती देतात. तुम्हाला शांत वातावरणात सुट्टीचा आनंद घ्यायचा असल्यास या बेटाचा नक्की विचार करा.

कोह रोंग बेट-

कंबोडियातील कोह रोंग हे बेट शांत वातावरण, समुद्र आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. सुट्टीच्या निमित्ताने फिरण्याचा बेत असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.

कॅट बा बेट-

व्हिएतनाममधील कॅट बा हे अत्यंत सुंदर बेट आहे. फिरण्यासोबतच ट्रेकिंग आणि इतर अनेक साहसी खेळांचा आनंद घेता येतो. तसेच सीटी बा नॅशनल फिरण्याची देखील संधी मिळते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *