सतत येणारे GoFYND मेसेज का येत आहे वाचा खासरेवर ..

मोबाईल वर येणारे कंपनीचे मेसेज आपल्या करिता नवीन गोष्ट नाही आहे. परंतु मागील काही दिवसापासून GOFYND नावाच्या एका कंपनीने कहर केलेला आहे. प्रत्येक मेसेज मध्ये १००० रुपये क्रेडीट मिळाले आहे असे सांगून आत्ता पर्यंत १०च्या वर एसएमएस प्र्त्येकास आले असेल. परंतु हे आहे तरी नक्की काय ? चला बघूया खासरेवर

whatsapp सांगण्यात येत आहे कि हा मेसेज hacking चा आहे आणि या मेसेज मुळे आपल्या बँकेतील पैसे काढून घेण्यात येतील. विशेष म्हणजे हा मेसेज महाराष्ट्र पोलिसाच्या नावाने वायरल होत आहे. परंतु हा प्रकार वेगळा आहे हि रेफरलचे बोनस आहेत म्हणजे एखाद्याला तुम्ही हि गोष्ट वापरा हे सांगितले तर तुम्हाला दिलेले बक्षीस आहे.

FYND हि एक E-Commerce वेबसाईट आहे यावर अनेक ब्रांड आपले कडपे,शूज इत्यादि विकतात. परंतु आपण जेव्हा हे app download करतो तेव्हा तो आपली फेसबुकची फ्रेंडलिस्ट आणि मोबाईल मधील नंबर आपल्याकडे सेव करून घेतो. सर्वच app करतात आणि त्यानंतर हा डाटा विविध कंपनीस प्रचाराकरिता विकल्या जातो.

तर GOFYND या सर्व नंबर वर मेसेज पाठवत आहेत आणि आपले ग्राहक वाढविण्याकरिता आपल्याला त्रास देत आहेत. आपण जर हे app download केले तर आपल्या मित्राला देखील हे मेसेज जातील त्यामुळे या पासून दूर राहिलेले बरे आहे. FYND ने सध्या online क्षेत्रातून रेटेल क्षेत्रात उतरायचा निर्णय घेतलेला आहे.

जर आपण हे app download केले असेल तर घाबरू नका आपले पैसे वगैरे चोरी जाणार नाही परंतु आपल्या मोबाईल मध्ये सेव असलेले मित्राचे नंबर हे सार्वजनिक होऊ शकतील.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *