‘या’ कपलचा झक्कास ‘गोविंदा डान्स’! ५० लाख लोकांनी बघितला व्हिडीओ..

सध्या सोशल मीडियावर अनेक कपलचे डान्सचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. मागील वर्षात सोशल मीडियावर वायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे अनेकजण रातोरात सुपरस्टार झाले. त्यामध्ये डान्सिंग अंकलचा डान्स तर तुफान वायरल झाला होता.

सध्या स्वत:च्याच लग्नात आता नवऱ्यामुलासोबत नवरी नवा ट्रेंडच आला आहे. आपल्या स्वत:च्या लग्नात नवरा-नवरीला नाचताना तुन्ही अनेकदा पाहिलं असेल पण सोशल मीडियावर एका कपलने त्यांच्या साखरपुड्यावेळी केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे.

या कपलने केलेला डान्स हा महिनाभरातच जवळपास ५० लाख लोकांनी बघितला आहे. या कपलने गोविंदाच्या गाण्यावर डान्स केला आहे. ११९७ साली आलेल्या गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या ‘हिरो नं.१’ चित्रपटातील ‘सोना कितना सोना है’ या गाण्यावर हे कपल डान्स करत आहे.

आशिष मित्तल नावाच्या एका यूट्यूब चॅलेनवर गेल्या वर्षी २९ डिसेंबरला हा कपल डान्स अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ४९ लाखांपेक्षा अधिक वेळा बघितलं गेलं आहे. या व्हिडिओत डान्स करणाऱ्या जोडप्याचं नाव आशिष मित्तल आणि ईशा मित्तल असल्याचे समजते आहे.

तुम्हालाही या कपलचा डान्स आवडेल यात शंका नाही. मागच्या वर्षी डान्सिंग अंकल यांनी गोविंदाच्या गाण्यावरच डान्स केला होता. तो सर्वांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *