बाळासाहेबांवरील आक्षेपार्ह टीकेमुळे एका शिवसैनिकाचे निलेश राणे यांना खुले पत्र!

निलेश राणे.
पत्राची सुरुवात नावानेच करतोय कारण सन्माननिय किंवा साहेब अस म्हणण्याचा पात्र तुम्ही मला तरी वाटत नाही. असो.

मागील काही दिवसांपासून तुमच्या भाषणात शिवसेना आणि सन्माननीय बाळासाहेब यांच्या बद्दल ची आक्षेपार्ह भाषा ऐकून हे पत्र लिहीतोय. कारण विझणारा दिवा जास्तच फडफडतो तशी काही परिस्थिती तुमची झाली आहे. ज्या कोकणातील जनतेवर दादागिरी करत एवढे दिवस राजकारणात टिकून होता त्याच जनतेने तुम्हाला आणि तिर्थरुपांना पण धडा शिकवला. तरीही सुंभ जळाला पण पीळ गेला नाही म्हणूनच अशी भाषा तुमच्या तोंडी आहे.

तुमच्या पहिल्या वकत्व्यांनंतर एका शिवसैनिकांने फोन करून त्यासंदर्भात विचारणा केली तेव्हा समोर ये पुरावे देतो आणि आय माय काढत शिव्या दिल्या. त्यावरून समजून आले की हे फ्रस्ट्रेशन आहे. डोळ्यासमोर पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. मग जगण्यासाठी ची शेवटची धडपड करताना जे होईल ते होईल अशी भुमिका तुमची दिसतेय.

खरतर असा फुटकळ शिव्या देणारा व्यक्ती खासदार नसावाच हे कोकणी लोकांनी दाखवून दिले त्यांचे आभार..कारण असे लोक गल्ली बोळात सापडतात.
जे फक्त बोलतात आणि ट्विटरवर प्रतिक्रिया विरोधात असल्या की त्यांना ब्लॉक करून समोर ये तुला दाखवतो अशी भाषा करतात. आधी सोशल मिडीयावर लोकांचा सामना करा पळ काढू नका.

कालच्या एका भाषणात पण असच वकत्व्य केलं की मला वाटलं उद्रेक होईल पण तस घडलं नाही म्हणून शिवसैनिकांना हिजडा म्हणण्यापर्यंत मजल गेली.
एका गोष्टी ची आठवण करून देतो.

दाढी करणार नाही अशी शपथ घेऊन दाढी करणार्याने आधी स्वतः ला आरशात पाहाव आणि मग दुसर्याला हिजडा म्हणावं. हिजडे पण स्वाभिमानाने जगतात पण आपलं काय..फक्त पक्षाच नाव स्वाभिमान आणि एकाच घरामध्ये तीन पक्ष घेऊन फिरत आहात. याला बुळचटपणा म्हणतात.

इन मीन तीन नेते त्यात पण लाचारी करत एक कॉंग्रेसचा एक भाजपचा आणि स्वतः च कुठेच ठिगळ नसणारे तुम्ही आता दुसर्याचा सांगण्यावरून बोलायच काम करा. हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार तस काहीस तुमच होतय. आणि अशावेळी शिवसेना नेते अनुल्लेखाने मारत आहेत म्हणून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे जेणेकरून प्रसिद्धी मिळेल आणि कमीतकमी बिग बॉस मध्ये तरी एंट्री मिळेल अशी अपेक्षा दिसतेय..पण शिवसैनिक ती संधी सुद्धा तुम्हाला देणार नाही.

रसत्यावरच्या प्रत्येक भुंकणार्या कुत्र्याला दगड मारत बसू नये हे शिवसैनिकांना चांगलच समजत. त्यामुळे सचिन जसा विरोधकांना मैदानात बॅट ने प्रत्युत्तर द्यायचा तसे प्रत्युत्तर आता शिवसैनिक तुम्हाला २०१९ ला निवडणुकीत देईल. तेव्हा तयार राहा पराभवाची चव पुन्हा चाखायला आणि तोपर्यंत फालतुगिरी करत राहा.

जय महाराष्ट्र
-एक शिवसैनिक

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *