सॅल्यूट ताई! शहीदाच्या पत्नीच्या या फोटोमागची कहाणी वाचून तुम्हीही सॅल्युट कराल..

आज दिवसभरात हा फोटो भयंकर वायरल होत आहे ज्या मध्ये एक स्त्री सैनिकाच्या स्मारक सोबत सेल्फी घेत आहेत. परंतु या मागची कथा अनेकांना माहिती नाही. तर सर्वात पहिले आपण बघुया हा पुतळा कोणत्या शाहिदचा आहे. तर हे स्मारक कर्नल एम. एन. राय यांचा आहे.

कर्नल एम एन राय 42 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी मिंडोरा गावात झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन स्थानिक दहशतवादीही ठार झाले. 42 राष्ट्रीय रायफलच्या एका तुकडीचे कमांडिंग ऑफिसर असलेल्या एम एम राय यांना प्रजासत्ताक दिनाला युद्ध सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं.

त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 27 जानेवारी 2015 रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. त्यांचा कुटुंबात पत्नी दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. उरी सिनेमातील लहान मुलीचा वार क्रायचा सीन हा त्यांच्या अंत्यविधीतील प्रसंगावर आधारित आहे. ह्या भावपूर्ण क्षणी सैनिकाना देखील अश्रू आवरले नव्हते.

एम एन राय यांची मुलगी अलका तिच्या धैर्याचे सर्वांनीच कौतुक केलं होत. वडिलांच्या मृत्यूनंतर कर्नल मुनेंद्र नाथ यांची मुलगी अलकाने वडिलांना श्रद्धांजली वाहताना सॅल्यूट केला होता. तो व्हिडीओ देखील अनेक लोकांनी बघितला होता.

आता फोटो मागील इतिहास जाणून घेऊया. कर्नल एम एन राय यांच्या लग्नाचा काल वाढदिवस होता या करिता आपल्या नवऱ्याच्या स्मारका सोबत काढलेला सेल्फी हा लाखो शब्द बोलून जातो. पत्नी प्रियंकाने अपलोड केलेल्या या फोतोस काही क्षणातच हजारो शेअर आणि लाखो कमेंट आलेल्या आहेत. पतीच्या स्मारकासोबत सेल्फी काढून प्रियांका यांनी लग्नाचा 18 वा वाढदिवस साजरा केला आहे.

प्रियंका आणि एम एन राय यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *