अरब देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व! यांच्यापुढे अंबानीची संपत्ती आहे चिल्लर…

सौदी चे एक शेख असेही आहेत,जे आपल्या उदार मनासाठी प्रसिद्ध आहेत.हे आहेत प्रिन्स अल वलिद बिन तलाल.एक वेळ अशी होती की वलिद घरून रिकाम्या हाताने जात असे.पण आज त्यांचं साम्राज्य १.२२ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.३०० लक्झरी कार्स,आणि जगातील सर्वात महाग विमान…
अल वलिद यांच्याकडे सर्वात महाग विमान आहे याला उडणारा राजवाडा सुद्धा म्हंटल जाते. तर चला खासरे वर बघूया प्रिन्स वलीद बिन तलाल यांचे शाही आयुष्य..

वलिद यांच्याकडे जगातील एकापेक्षा एक आणि महाग किंमतीच्या ३०० वेगवेगळ्या गाड्यांचा कलेक्शन आहे. यांच्या एका मर्सडीजला संपूर्ण हिरे लावले आहेत या मर्सडीजची किंमत ३२ कोटी रुपये आहे.त्यांची कंपनी किंगडम होल्डिंग हे उंच उंच इमारती बनवण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.फोर्ब्स ने त्यांना अरब देशांचा वॉरेन बफेट सुद्धा म्हंटल आहे.

लहानपणी होते अतिशय खोडकर

अल वलिद यांचा जन्म सौदी अरबच्या राजपरिवारात ७ मार्च १९५५ मध्ये झाला.त्यांची आई मोना अल सुलह लेबेनॉनचे पहिले पंतप्रधान रियाद अल सुलह यांची मुलगी होती.त्यांचे वडील प्रिन्स तलाल हे १९६० मध्ये सौदी अरबचे वित्तमंत्री होते.जेव्हा ते ७ वर्षाचे होते तेव्हा त्यांचे आई-वडील वेगळे झाले आणि ते आपल्या आईसोबत लेबेनॉनला राहू लागले.अल वलिद यांच्याविषयी सांगितलं जातं की ते नेहमी घरून पळून जात असत. आणि बाहेर जाऊन मोकळ्या असलेल्या गाडीत झोपत असत.

अल वलिद कसे बनले करोडपती

अल वलिद यांच्या बायोग्राफी मध्ये उल्लेख करताना फोर्ब्स ने सांगितलं होतं की,त्यांनी १९७९ साली स्वतःचा व्यवसाय चालू केला.सुरुवातीला त्यांनी आपल्या वडिलांकडून ३०,००० डॉलर(जवळपास १६ लाख रुपये) कर्ज म्हणून घेतले आणि वडिलांनी दिलेल्या घराला गहाण ठेवून ४ लाख डॉलर मिळविले.या व्यतिरिक्त त्यांना त्यांच्या आजोबापासून १५००० डॉलर मिळत होते.हळू-हळू व्यवसाय वाढत गेला.२०१६ मध्ये त्यांची संपत्ती १७.३बिलियन डॉलर एवढी होती.फोर्ब्स ने त्यांना जगातला ४१ वा सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केले होते.

ट्रम्प यांच्याकडून खरेदी केला जगातील ६५ वा सर्वात लांब प्रायव्हेट क्रूझ

अल वलिद यांच्याकडे ८५.९ मीटर लांब एक प्रायव्हेट क्रूझ आहे जो जगातील ६५ वा सर्वात लांब क्रूझ आहे.ट्रम्प यांनी या क्रूझला त्यांच्या पत्नीचे नाव दिले होते पण अल वलिद यांनी ते बदलून किंगडम 5KR अस ठेवलं.

अल वलिद यांच्याकडे आहे सोन्यानी बनलेले विमान

अल वलिद यांच्याकडे बोइंग ७४७ आणि एअरबस ३२१ एअरक्राफ्ट पण आहे,ज्याला त्यांनी प्रायव्हेट जेट मध्ये बदलवून टाकलं आहे.त्यांच्याकडे सोन्याने बनलेलं विमान सुद्धा आहे,ज्याला जगातील सर्वात महाग विमान म्हणून सुद्धा ओळखलं जाते.यालाच उडणारा राजवाडा सुद्धा म्हंटल जाते.

तीन मोठे पॅलेस

प्रिन्सकडे तीन मोठे पॅलेस आहेत.त्यापैकी एक पॅलेस ज्याचं नाव किंग रिजोर्ट आहे हे ५० लाख वर्ग मीटर मध्ये पसरलेला आहे.यामध्ये भव्य गार्डन आणि तीन स्विमिंग पूल सुद्धा आहेत.दुसरा प्रमोशन पॅलेस रियाद मध्ये आहे.या पॅलेसची किंमत ३०० मिलियन डॉलर आहे.यामध्ये ३१७ खोल्या आणि १५,००० टन मार्बलचा उपयोग केला गेला आहे.यामध्ये सिल्क ओरियंट कार्पेट मध्ये सोन्याच्या तार या आहेत,याशिवाय २५० टीव्ही आहे.हे ४० लाख वर्ग मीटर मध्ये पसरला आहे.

भारतातल्या भूकंप ग्रस्तांनासुद्धा केली मदत

भारतात २००४ मध्ये आलेल्या भूकंप आणि त्सुनामीग्रस्तांसाठी अल वलिद यांनी १७ मिलियन डॉलरची मदत केली होती.अमेरिकेच्या जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीला प्रत्येकी १०-१० मिलियन डॉलर दान केले.फलीस्थानच्या विस्थापितांना १८.५ मिलियन पौंडची मदत केली.

दोन पत्नीपासून झाला आहे घटस्फोट

अल वलिद यांचा विवाह सौदीच्या राजाची मुलगी अमिराह बींट तवीर सोबत झाला होता.त्यांच्यापासून त्याला दोन मुले आहेत-रीमा आणि खालिद.यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.२००८ मध्ये सौदीची प्रिन्सेस अमिरा अल तविल यांच्या सोबत दुसरा विवाह झाला पण ६ वर्षांनी या दोघांचा घटस्फोट झाला.

सैनिकी शाळेतून घेतले प्रशिक्षण

अल वलिद यांनी रियाद येथील सैनिकी शाळेत ऍडमिशन घेतले होते.जिथे त्यांना कडक शिस्त शिकण्यास मिळाली.त्यांनी मॅनेलो कॉलेज, कॅलिफोर्निया मधून १९७९ मध्ये बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली आणि त्यानंतर १९८५ मध्ये साराकस युनिव्हर्सिटी मधून मास्टर डिग्री मिळविली.

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणी आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *