आमदार सुरेश धस जेव्हा हम तुम्हे चाहते है ऐसे गाणे म्हणतात बघा व्हिडीओ

बीड जिल्ह्यातील सुरेश धस हे नाव नेहमी चर्चेत राहते कधी त्यांनी केलेला पक्ष बदल तर कधी त्यांची निवडणूक आणि त्यानंतर जल्लोष करताना केलेला डान्स आज आमदारांची एक वेगळी बाजू बघायला मिळाली आहे ती म्हणजे गायनाची,

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीतील त्यांनी विजय मिळवला होता. ‘बेटा बेटा होता है और बाप बाप’ असे म्हणत त्यांनी तेव्हा धनंजय मुंडे यांना डिवचले होते. त्यांचा डान्स देखील बरेच वेळा सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला होता. सुरेश धस जो पर्यंत विजयी होणार नाही तो पर्यंत कपडे घालणार असा असे कार्यकर्ते देखील त्यांच्या कडे होते.

निवडणुकीतील विजया नंतर चक्क त्यांनी बुलडोजर मधून मिरवणूक काढून गुलाल उधळला होता. ह्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येईल कि सुरेश धस हे नेहमी वेगळ्या स्टाईल करता चर्चेत असतात.

त्यांचे अनेक विधाने मागे सोशल मिडीयावर वायरल झाली होती. परंतु सध्या चर्चा आहे त्यांच्या गाण्याची, एका सार्वजनिक गीतांच्या कार्यक्रमात चाहत्यांनी सुरेश धस यांना गाणे म्हणण्याचा आग्रह धरला आणि सुरेश धस यांनी ‘हम तुम्हे चाहते है’ हे जुन्या हिंदी सिनेमातील गाणे गायले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात फिरत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *