सैनिकांच्या कुटुंबियांसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला हा अभिमानास्पद निर्णय..

देशाच्या सीमेवर रक्षण करताना अनेक सैनिक आपल्या प्राणाची आहुती देतात. ऊन वारा पाऊस थंडी कशाचीही पर्वा न करता ते सीमेवर रक्षण करत असतात. देशातील प्रत्येक राज्यातून अनेक सैनिक सैन्यात देशसेवेसाठी भरती होतात. यामध्ये महाराष्ट्रातील सैनिकांची संख्या देखील मोठी असते.

महाराष्ट्राच्या अनेक सैनिकांनी देशाच्या सीमेवर मात्रभूमीचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. एखादा जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळतो. शहीद जवानांच्या कुटुंबासाठी आजपर्यंत वेगेवेगळ्या स्वरूपात मदत पोहचली जायची. सरकारकडून देखील कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर मदत दिली जायची.

पण महाराष्ट्र सरकारने आज एक असा निर्णय घेतला आहे जो खरंच कौतुकास्पद आहे. अन फक्त निर्णय घेऊन न थांबता आज तो अमलात देखील आणला आहे. खासरेवर बघूया काय आहे नेमका हा निर्णय-

शहीद जवानांच्या परिवाराच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने 5 एकर जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. अन राज्यात शाहिदच्या परिवाराला मोफत जमीन देण्याचा हा निर्णय अमलात देखील आणला आहे. पहिला मान नांदेड जिल्ह्याला मिळाला असून एका जवानाच्या कुटुंबाला आज पाच एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली.

कोणाला मिळाला पहिला मान-

या योजनेचा लाभ नांदेड जिल्ह्यातील शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबाला मिळाला आहे. संभाजी कदम हे २९ नोव्हेंबर २०१६ रोजी कर्तव्य बजावताना काश्मीर मधील नागरोटा येथे शहीद झाले होते. संभाजी कदम हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि मुलगी आहे.

राज्य सरकारने हा निर्णय मागच्या वर्षीच घेतला होता. या निर्णयावर आज नांदेड जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ अमलबजावणी केली. शहीद संभाजी कदम यांच्या परिवाराला 5 एकर शेतीयोग्य सरकारी जमीन खरबी या गावात मोफत दिली आहे. राज्यात शहीदांच्या कुटुंबाला मोफत जमीन देण्याचा पहिला मान देखील नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे.

सरकारचा हा निर्णय शहीद कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. कारण एखादा जवान शहीद झाल्यानंतर तो घरातील बऱ्याचदा एकुलता एक कमावता व्यक्ती असतो. आता मात्र सर्व शहिदांच्या कुटुंबियांना ५ एकर जमीन मिळणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *