तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण बॉलिवूड कलाकारांना देखील आहेत या चित्रविचित्र सवयी…

बॉलीवूडमधील कलाकारांचे आयुष्य खूप चैनीचे असते असे आपण म्हणतो. त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक असतात. सहसा बॉलीवूडकर मंडळी देखील सामान्य आयुष्य जगताना दिसतात. त्यांचा रोजचा दिनक्रम पण सामान्य माणसांप्रमाणे असतो. एवढेच नाही तर त्यांना सामान्य माणसांप्रमाणे शौक आणि वेगवेगळ्या सवयी देखील असतात.

खासरेवर जाणून घेऊया बॉलीवूडमधील काही मोठ्या कलाकारांच्या चित्रविचित्र सवयी-

१. जॉन अब्राहम-

अभिनेता जॉन अब्राहमचे बाइकप्रेम सर्वश्रुत आहे. त्याला गाड्यांचा विशेष शौक आहे. पण जॉनला एक विचित्र सवय देखील आहे. ती म्हणजे जॉन हा सतत आपला पाय हलवत राहतो. हे आपल्यापैकी खूप कमी जणांना माहिती असेल. अनेकदा या सवयीमुळे त्याच्यावर शूटिंग थांबवण्याची वेळ आली आहे.

२. जितेंद्र-

जितेंद्र हे बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते आहेत. सोबतच ते डॉक्टरही आहेत. पण तुम्हाला वाचून किळस वाटेल कि अभिनेता जितेंद्र यांना चक्क टॉयलेटमधे बसून खाण्याची सवय आहे. जितेंद्र यांना हि घाणेरडी सवय फार पूर्वीपासून आहे. खासकरुन ते टॉयलेटमध्ये बसून पपई खातात.

३. शाहरुख खान-

शाहरुख खान हा बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख सर्वत्र नेहमी सुतुबुटात दिसतो. आपल्यापैकी त्याची सिगारेट पिण्याची सवय सर्वाना माहिती असेल. पण त्याला अजून एक विचित्र सवय आहे. पण त्याला सुटाबुटात राहायची विचित्र सवय आहे. तो घरात देखील अनेकदा सुटाबुटात फिरतो.

४. सुष्मिता सेन-

सुष्मिता सेनला एक खूपच विचित्र सवय आहे. या गोष्टीबद्दल तुम्ही कदाचितच कुठे वाचले असेल. सुष्मिता सेनला मोकळ्या जागेत अंघोळ करायची सवय आहे. तिला आकाशाकडे बघत अंघोळ करायला आवडतं. त्यासाठी तिने आपल्या घराच्या छतावर विशेष व्यवस्था यासाठी केलेली आहे. ती अनेकदा घराच्या छतावर अंघोळ करते.

५. शाहिद कपूर-

अभिनेता शाहिद कपूरला सतत कॉफी पिण्याची सवय आहे. त्याला जर फार वेळ कॉफी पासून दूर ठेवलं तर तो बेचैन होतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *