सौदी देशातील नियम वाचून आपल्याला धक्काच बसेल..

सौदी अरब देशात शरियाचे नियम चालतात हे सर्वाना माहिती आहे. परंतु शरीयाचे नियम नेमके काय आहेत हे अनेकांना माहिती नाही. आज बघूया खासरेवर सौदी मध्ये कश्या प्रकारे गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते. सौदी मध्ये देशातील नियमांच्या वर काहीच नाही, गुन्हा केल्यास इथे माफीची कुठलीही तरतूद नाही आहे.

सौदी मक्का मदिना करिता प्रसिद्ध आहे जग भरातील मुस्लीम लोक मक्केस येतात. महम्मद पैगंबर यांचे जन्म स्थान आणि इथूनच इस्लाम जगाला मिळाला असे त्यांचे मानणे आहे. प्रत्येक मुस्लिमाने आयुष्यात एक वेळ हज करावे असे सांगण्यात येते. तर आज शरिया नियमाविषयी इथे माहिती बघूया.

चोरी करणे: एखाद्या व्यक्तीने चोरी केल्यास आपल्या कडे कोर्ट कचेरीचे चक्कर मारावे लागतात आणि त्यानंतर त्याला शिक्षा होईल का हे सांगता येणार नाही परंतु सौदी मध्ये कोणी चोरी केलेली आढळल्यास त्याचे हात कापाचे आदेश देण्यात येते.

बलत्कार: भारतात देखील आता बलत्कार केल्यास मृत्युदंडाची तरतूद केलेली आहे परंतु मृत्युदंड दिलेल्या घटना आढळत नाही. इथे बलत्कार केल्यास फाशी नक्की दिल्या जाते. त्यामुळे या देशात स्त्रिया सोबत बलत्कारांच्या घटना घडत नाही.

सौदीचा राजा या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास भर देतो. एवढच नाहीतर आपला भाऊ सलमान याला त्याने २०१६ मध्ये मृत्युदंड दिला होता. त्याचा भाऊ हत्येच्या आरोपात दोषी ठरला होता. राजा असो कि प्रजा येथे सर्वाना नियम समान आहेत. अनेक वर्षापासून या देशाची कमान सौद परिवाराकडे आहे.

या देशात Valentine डे सारखे दिवस साजरे करायला जमत नाही. स्त्रियांना इतर पुरुषा सोबत सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास किंवा मिसळण्यात परवानगी नाही आहे. दारू आणि सिनेमा गृहास देखील येथे बंदी आहे त्यामुळे अनेक सौदीचे परिवार बाजूला असलेल्या बहीराण या ठिकाणी जाऊन सिनेमा बघतात किंवा मद्यपान करतात.

महिलांना गाडी चालविण्यास येथे परवानगी नाही, तसेच इस्लाम सोडून कुठल्याही धर्माची उपासना येथे जमत नाही. तसेच संगीत शिकण्यावर देखील येथे बंदी आहे. त्यामुळे आपण नशीबवान आहोत कि आपला जन्म असल्या देशात नाही झाला नाही.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *