जॉर्ज फर्नाडिस ख्रिस्ती असूनही का केल्या जाताय त्यांचे अंत्यसंस्कार हिंदू रितीरिवाजाप्रमाणे..

जॉर्ज फर्नाडिस हे जात धर्म प्रांत भाषा यांच्या पलीकडे गेलेले नेतृत्व आहे. त्यांचे कामगार चळवळीतील योगदान अत्यंत मोठे आहे. तसेच देशाचे रक्षामंत्री म्हणून देखील त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या बद्दल सर्व सामान्य माणसाच्या मनात एक आदर आहे. पण सध्या ते कॅथलिक ख्रिश्चन असून देखील त्यांचा अंत्यसंस्कार हा हिंदू रितीरिवाजाप्रमाणे का होत आहे हा प्रश्न आपल्याला हि पडला असेल?

याबाबत त्यांच्या जवळील व्यक्ती जया जेटली यांनी माहिती दिली कि जॉर्ज फर्नाडिस यांनी आपल्या अंतिम संस्काराबद्दल एक इच्छा जाहीर केली होती. ती म्हणजे त्यांचे अंतिम संस्कार हे हिंदू व ख्रिस्ती या दोन्ही धर्माप्रमाणे व्हावेत. त्यामुळे त्यांचे दहन करून त्यांच्या अस्ति या दफन करण्यात येणार आहेत. त्यांच्या इच्छेनुसारच त्यांचे अंत्यसंस्कार हे दोन धर्मानुसार होणार आहेत.

जॉर्ज फर्नाडिस हे कामगार नेते तसेच सर्वात प्रथम कामगारांसाठी मुंबई बंद करणारे नेते आहेत. त्यांनी मुंबई मध्ये गिरणी कामगार महापालिका कामगार बेस्ट रेल्वे असंघटित कामगार यांच्या संघटना बांधून त्यांच्या हक्क अधिकारासाठी लढा देण्याचे काम केले . जॉर्ज हे १९६७ पासून २००९ पर्यंत ९ वेळा लोकसभेत निवडून गेले होते.

तसेच विविध सरकार सोबत त्यांनी तीन वेळा मंत्रिपद घेऊन देशासाठी मंत्री म्हणून हि कार्य केले.अशा या जॉर्ज फर्नाडिस यांना २००९ साली स्मृती चा आजार झाल्याने त्यांना कोणत्याही गोष्टी आठवणीत राहत नव्हत्या म्हणून ते सर्व क्षेत्रातून अलिप्त होते. काल २९ जानेवारी रोजी त्यांचे दुःखद निधन झाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *