या गावातील आई वडील मुलाला डॉक्टर इंजिनीयर नाहीतर भिकारी बनायचे शिकवतात..

शीर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल परंतु गोष्ट हि तशीच आहे. भारतात असे अनेक अजब गजब गाव आहेत जिथे वंश परंपरे नुसार काम करण्याची प्रथा सुरु आहे. कुठे आहे हे गाव आणि का आहे येथील पालकांची हि इच्छा आज खासरेवर बघूया..

हि गोष्ट आहे उत्तर प्रदेश मधील मैनपुरी जिल्ह्यातील नगला दरबारी या गावची या गावातील आई वडील मुलाला डॉक्टर इंजिनीयर नाहीतर भिकारी बनवायचे स्वप्न बघतात. या गावाची लोकसंख्या फार कमी आहे या गावात ३० कुटुंब राहतात. संपूर्ण गावात तुम्हाला फक्त मातीचे घरे दिसतील. शनीशिंगणापूर प्रमाणे संपूर्ण गावातील एका हि घरास दरवाजा नाही आहे.

पैसा नाहीच तर चोरी होणार कुठे असे लोक बोलतात , या गावात आजही वीज तथा पाण्याची देखील व्यवस्था नाही आहे. स्वतंत्र मिळून ७० वर्ष होऊन सुध्दा आजही हे लोक अतंत्य हलाखीची परिस्थिती जगतात. गावाचा मुख्य माणूस जोहरी नाथ सांगतात कि, ” १९५८ साली ख्यालीनाथ हे माझे वडील यांच्या सोबत मी इथे आलो. सुरवातीला वडिला प्रमाणे सापाचा खेळ दाखवून पोट भरायचो. परंतु यावर बंदी आल्याने आता भिक मागून जगावे लागत आहे.”

कुठलीही सरकारी योजना इथे न पोहचल्याने त्यांना सरकारची शाळा वगैरे इत्यादी बद्दल काही माहिती नाही. इथे सरकारी शाळा नाहीतर एक प्रायवेट शाळा आहे जी गावातील लोक चालवतात. या शाळेत अभ्यासक्रमात भिक मागण्याचे धडे दिले जातात. सापाला कसे खेळवायचे इत्यादी शिकवले जाते. जवळपास २०० लोकसंख्या असलेल्या या गावात १०० रुपये प्रत्येक व्यक्तीची रोजची कमाई आहे.

परंतु सापाचा खेळ दाखवण्यावर सरकारने बंदी आणल्यामुळे अनेकांना जेलची वारी देखील करावी लागली आहे. तिहाड जेल मध्ये येथील अनेक लोक जाऊन आलेले आहे. सरकारने या गावाच्या आणि येथील मुलांच्या विकासा करिता काही पाउल उचलणे आवश्यक आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *