कॅमेरामॅन जवळ जाऊन त्यांच्या जेवणाची चौकशी करणारा ‘राजा माणूस’ ! बघा व्हिडीओ..

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे रविवारी विवाहबंधनात अडकले आहेत. सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत अमित आणि मितालीचा लग्नसोहळा पार पडला आहे. यावेळी अनेक दिग्गज मान्यवर मंडळीनी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली होती.

राज ठाकरेंची सुनबाई प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ संजय बोरुडे यांची मुलगी मिताली आहे. अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात झालंय. ठाकरे कुटुंबात तब्बल २८ वर्षानंतर सनई चौघडे वाजले आहेत. लग्नसमारंभात राज, उद्धव आणि जयदेव ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं बघायला मिळालं.

राज ठाकरे यांचे सर्वपक्षीय नेते आणि सर्वच क्षेत्रातील दिग्गजांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे लग्नात सर्वच क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती बघायला मिळाली. २ दिवस सोशल मीडियावर आणि सर्वत्र राजपुत्राच्या लग्नाची चर्चा होती.

लग्नसोहळा पार पडल्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. राज ठाकरे हे आपल्या मुलाच्या लग्नात चांगलेच व्यस्त होते. एवढे मोठे नामवंत पाहुणे आले होते. असे असतानाही एवढ्या गडबडीत त्यांनी लग्नाला आलेल्या पत्रकारांना आणि फोटोग्राफर्सना जवळ येऊन चौकशी केली आणि जेवणाची विनंती केली.

हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी ‘जो माणूस कॅमेरा मॅनजवळ जाऊन त्याच्या जेवणाची विचारपूस करतो त्या वरूनच त्याची सामान्य जनतेबद्दलची काळजी लक्षात येते’ असे कॅप्शन लिहून हा व्हीडिओ शेअर केला आहे.

सिनेमराठी या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. राज ठाकरेंचा साधेपणा तुम्ही बघितला ला?

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *