कंटेनरचा पाठलाग करून या आमदाराने केला गायींच्या तस्करांचा पर्दाफाश!

हैद्राबाद मध्ये काल एक एका आमदाराने कंटेनरचा पाठलाग करत कंटेनर पकडून गायींच्या तस्करांचा पर्दाफाश केला. हे आमदार आहेत हैद्राबाद मधील गोशामहल मतदारसंघाचे भाजपचे टी राजसिंग. टी राजसिंग यांनी स्वतः पाठलाग करून गायींनी भरलेला ट्रक पोलिसांना पकडून दिला.

एका कंटेनरमधून गायींची तस्करी होत असल्याचा माहिती टी राजसिंग यांना मिळाली होती. त्यांनी इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या कंटेनरचा पाठलाग केला. हिंदू नेता म्हणून ओळख असलेले राजासिंग यांनी ड्रायव्हरच्या विरोधात तक्रार देऊन गायीची सुटका केली.

कोण आहेत राजा सिंग-

टी राजासिंग हे भाजपचे तेलंगणामधील एकमेव आमदार आहेत. तसेच ते श्रीराम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत. तेलनगणात भाजपचा त्यांच्या रूपाने एकमेव आमदार नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आला होता. राजासिंग हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात.

ओवैसी बंधूना टक्कर देणारे हैद्राबादमधील एकमेव हिंदू नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. गोमाता हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांनी यापूर्वी गोरसक्षणसाठी भारतीय जनता पार्टीचा व आमदारकीचा राजीनामा देखील दिला होता. ते अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी देखील चर्चेत असतात.

भाजपने गौहत्या रोखण्यासाठी पाठिंबा दिला नसल्याची टीका करत त्यांनी २०१८ मध्ये आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांना अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी पोलिसांनी अटकही केली आहे. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला तेव्हा देखील, ‘गायींसाठी एक तर मारणार किंवा मारणार असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

टी राजासिंग हे हैद्राबाद मध्ये रामनवमी आणि शिवजयंतीचे मोठ्या उत्साहात आयोजन करतात. टी राजासिंग यांचा जन्म १५ एप्रिल १९७८ ला हैद्राबाद मधील धूलपेठ येथे झालेला. भाजपने तेलंगणात लढवलेल्या 119 जागांपैकी केवळ एक जागा भाजपाला जिंकता आली होती. आपल्या कट्टर हिंदुत्ववादी बाण्यामुळे टी राजासिंग ओळखले जातात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *