जगात दबदबा असलेल्या कोहलीला धोनीची हि कला शिकण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल!

भारतीय संघाचा सध्या जगभरात दबदबा आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताने मागील काही वर्षात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मागील काळात भारताचे अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त झाले. पण भारताकडे प्रतिभावान खेळाडूंचा खजिनाच आहे. भारतीय संघात असलेल्या युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा सिद्ध करत संघात स्थान बळकट केले आहे.

भारतीय संघात सध्या महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, शिखर धवन, अजिंक्य रहाणे हे अनुभवी खेळाडू आहेत. विराट कोहलीने क्रिकेटविश्वात अनेक विश्वविक्रम करून दबदबा निर्माण केला आहे. विराट कोहली हा तिन्ही फॉरमॅट मध्ये मागील काही वर्षांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

रोहित शर्मा हा देखील विराटला चांगली साथ देतो. तो देखील चांगला फॉर्ममध्ये आहे. पण यामध्ये भारतीय संघात धोनीचे खूप महत्व आहे. धोनी हा भारतासाठी आतापर्यतचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेला आहे. त्यामुळे धोनीच्या संघात असण्याला खूप महत्व आहे.

पुढील काही महिन्यात भारतीय संघात एक मोठा बदल झालेला बघायला मिळू शकतो. कारण सर्व जणांना माहिती आहे कि यावर्षीच्या विश्वकपनंतर धोनी क्रिकेटमधून सन्यास घेऊ शकतो. धोनीने यापूर्वीच टेस्टमधून निवृत्ती घेलती आहे. दुसरे खेळाडू कितीही चांगलं प्रदर्शन करत असले तरी धोनीच्या काही स्किल्स आहेत ज्या दुसऱ्या खेळाडूंना जमणार नाहीत.

धोनी वनडे आणि टी २० मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळतो. पण त्याचा विकेटच्या मागे असलेला रोल खूप महत्वाचा आहे. तोच रोल येणाऱ्या काळात विराट कोहलीसाठी खूप अडचणी आणणारा ठरू शकतो. धोनी टीममध्ये कर्णधार म्हणून नसला तरी तो स्टम्पच्या मागून गोलंदाजासाठी फिल्डिंग सेट करताना बऱ्याचदा दिसतो.

धोनी गोलंदाजासाठी प्लॅनिंग करून फिल्ड सेट करतो आणि त्यांच्याकडून प्लॅननुसार एक एक बॉल टाकून घेतो. आणि त्यातून जो रिजल्ट येतो तो आपल्याला सर्वाना माहितीच आहे. विराट हा सहसा सीमारेषेवर फिल्डिंग करताना दिसतो आणि धोनीचं फिल्ड सेट करतो. पण धोनीचा हा रोल तो निवृत्त झाल्यानंतर किती महत्वाचा आहे हे येणाऱ्या काळात कळेलच.

मागील २ वनडे सामन्यातील काही गोष्टी तुम्ही बघितल्याचं असतील. उदाहरणार्थ रॉस टेलरचे यष्टिचित असेल किंवा मग बोल्टची विकेट असेल, धोनीचे प्लॅनिंग खासच असते हे दिसते. धोनीच्या या स्किल्स कोहलीला शिकून घेणे आवश्यक आहे. पण धोनी विकेटकिपर असल्याने त्याला हे प्लॅनिंग करणे सोपे जाते.

बघा धोनीची वेगवान स्टॅम्पिंग-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *