ठाकरे सिनेमात बाळासाहेबांसोबत सुरवातीपासून राहणारे दत्ताजी खऱ्या आयुष्यात कोण होते ?

बाळासाहेब ठाकरे यांनी पत्नी व मुलाच्या मृत्यूनंतर या सहकाऱ्यांच्या खांद्यावर डोके ठेवून अश्रुना वाट मोकळी केलेली. एवढा जवळचा व्यक्ती कोण होता तो ? सिनेमात हि दत्ताजी सतत बाळासाहेबांसोबत होते.

ठाकरे चित्रपटात आपण एक व्यक्ती बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सावली प्रमाणे असते हे आपण पाहिले..ती व्यक्ती म्हणजे दत्ताजी नलावडे. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेच्या स्थापने अगोदर पासून चे सर्वात पहिले सहकारी म्हणून दत्ताजी साळवी यांचे नाव घ्यावे लागेल. बाळासाहेब ठाकरे यांना हि दत्ताजी साळवी यांचा आधार वाटायचा. त्या दत्ताजी साळवी यांच्या बद्दल आज आपण खासरे वर जाणून घेऊया.

दत्ताजी साळवी यांचा जन्म १५ जून १९१८ रोजी कोकणातील चिपळूण तालुक्यातील असुर्डे गावात झाला. वडील नारायण साळवी हे मिल मध्ये काम करायचे. त्यांच्यामुळे दत्ताजी व त्यांचा परिवार मुंबई येथे आला. दत्ताजी हे मिल मध्ये जॉबर होते सोबत ते इंटक या काँग्रेस च्या कामगार चळवळीचे पदाधिकारी सुद्धा होते.त्यांची व बाळासाहेब ठाकरे यांची भेट हि दादर येथील एका व्याख्यान कार्यक्रमात झाली होती. त्या कार्यक्रमात जॉर्ज फर्नाडिस व बाळासाहेब ठाकरे वक्ते तर अध्यक्ष म्हणून दत्ताजी साळवी होते. कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दत्ताजी साळवी बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी गेले आणि त्यांनी बाळासाहेबांना सांगितले कि आपण काल जे कार्यक्रमात विचार मांडले ते मला आवडले आणि मी जॉब सोडून आपल्या सोबत काम करणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना जॉब सोडून असा निर्णय घेऊ नका अजून संघटना वैगेरे काही बनली नाही असे सांगायचा प्रयत्न केला पण ते ऐकायची मानसिकता तेव्हा दत्ताजी साळवी यांची नव्हती. आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरे याना एक खंदा सहकारी मिळाला. तेथून शिवसेनेची स्थापना असो कामगार सेनेची स्थापना असो बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सतत दत्ताजी असायचे. सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्ले व्हायचे त्यावेळी दत्ताजी यांची साथ असायची. त्यावेळी ते ढाल म्हणून पुढे यायचे.

शिवसेना आणि कामगार यांचा जो संबंध आहे तो दत्ताजी साळवी यांच्यामुळेच त्यांच्या कामगार चळवळीचा अनुभव त्यांनी शिवसेना कामगार सेनेच्या कार्यासाठी वापरला ते कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या अगोदरचे भाषण हे दत्ताजी यांचे असायचे त्यांच्या भाषणाने सभा तापत असायची. बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ते महाराष्ट्रभर फिरले.

कामगारांसाठी लोणावळा येथे त्यांनी कामगार भवन ची मोठी इमारत उभी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात मोठे दुःखद प्रसंग ओढवले ज्यात मीनाताई ठाकरे व बिंदुमाधव ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा दत्ताजी साळवी यांच्या खांद्यावर डोके ठेवून बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली. असे बाळासाहेब ठाकरे यांचे नुसतेच सहकारी म्हणून नाहीतर आधार म्हणून जीवन वावरलेले दत्ताजी होते.

शिवसेना भाजप ची सत्ता आल्यानंतर त्यांना स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. कधीच त्यांनी कोणत्या पदासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे मागणी केली नाही. फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्टाठेवून आयुष्य व्यतीत केले. त्यांनी मृत्यूसमयी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या मी आलोय या वाक्याला प्रतिसाद देऊन निरोप घेतलेला.

आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे हे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *