भारत वनडे मध्ये जगभरात वर्चस्व गाजवतोय तो फक्त या मराठमोळ्या खेळाडूमुळेच !

भारतीय संघ सध्या जगभरात वर्चस्व गाजवत आहे. क्रिकेट विश्वास असलेल्या ऑस्ट्रोलियाच्या वर्चस्वाला भारताने मागील काही वर्षात हादरा दिला आहे. तिन्ही फॉरमॅट मध्ये भारताने आपला डंका वाजवला आहे. भारतीय संघात नव्या दमाच्या खेळाडूंचा भरणा आहे. सर्वच क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केले आहे.

भारतीय संघात संधी मिळवण्यासाठी अक्षरशः चढाओढ लागलेली दिसत आहे. एक खेळाडू जखमी झाला कि दुसरा येऊन खूप चांगले प्रदर्शन करत आहे. या प्रदर्शनाच्या जीवावर भारताने नुकतेच ऑस्ट्रोलियमध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवले. अगोदर कसोटीमध्ये ऐतिहासिक मालिका विजय आणि नंतर वनडे मालिकेतसुद्धा विजय मिळवला.

भारतीय संघात सध्या रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. पण यामध्ये केदार जाधवचे प्रदर्शन आणि टीममध्ये असणे भारतीय संघाला अधिकच फायद्याचे ठरत असल्याचे समोर आले आहे.

केदार जाधव मागील काही सामन्यांमध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण त्याने न्यूझीलंडमध्ये पुन्हा आपला फॉर्म दाखवून दिला आहे. केदार जाधव हा फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीत सुद्धा आपली कमाल दाखवून देतो. अगदी महत्वाच्या फलंदाजांना बाद करून तो संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी करत आहे. पण केदार जाधवच्या नावावर असाही एक रेकॉर्ड आहे, जो वाचून तुम्हीही त्याला लकी चार्म म्हणाल.

मराठमोळा केदार भारतासाठी लकी चार्म-

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या वनडे मालिकेत भारताने पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवत मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. या सामन्यात केदार जाधवने अष्टपैलू खेळ केला होता.

याशिवाय अभिमानाची बाब म्हणजे केदार जाधवने मागच्या वर्षभरात १७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यापैकी भारताने तब्बल १६ सामने जिंकले आहेत तर १ सामना बरोबरीत सुटला आहे. म्हणजेच केदार टीममध्ये असताना भारताचा पराभवच झालेला नाहीये. केदार जाधव भारतीय टीमसाठी एकप्रकारे लकी चार्म ठरत आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये दमदार फलंदाजी-

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 7 गडी आणि 4 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला होता. पण या सामन्यात भारताला एकावेळी सामना जिंकणे कठीण झाले होते. दुखापतीतून सावरलेला केदार जाधव मालिकेतील हा पहिलाच सामना खेळत होता. केदार जाधवने 57 चेंडूत 61 धावा करत धोनीला चांगली साथ दिली.

त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने भारताला दिलेले 231 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने सहज पार केले होते. महाराष्ट्राच्या या सह्याद्रीपुत्राने मॅचच्या शेवटी येऊन जबरदस्त मारून भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *