पेनाच्या टोपणाला मागे छिद्र का असतं याबाबत कधी विचार केला आहे का?

आपल्या रोजच्या वापरात येणाऱ्या पेनामध्ये एक कॉमन गोष्ट आपल्या नेहमी नजरेस पडते, ते म्हणजे टोपणाला असणारे छिद्र. पण आपण कधी विचार केला आहे का की ते नेमके का असते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसेल. पण यामागे एक अलौकिक करण आहे. सर्व पेन च्या टोपणाला छिद्र नसेलही, पण बऱ्यापैकी तुम्हाला तर नजरेस पडू शकते.चला तर खासरेवर आज आपण जाणून घेऊया यामागील कारण.

एक साधं अनुमान म्हणजे यामुळे शाई लवकर वाळते-

बघायला गेलं तर थोडं वेगळं वाटेल पण टोपणाला असलेल्या या छिद्रामुळे खरंच पेनाची शाई लिहिल्यानंतर लवकर वाळायला मदत होते. बरेच जणांना असे व वाटते की कंपन्या मुद्दाम ते छिद्र ठेवतात. त्यामुळे शाई लवकर संपते व आपण नवीन पेन विकत घेतो. पण यामध्ये थोडेही तथ्य नाहीये.

एका संशोधनात दबाव नियंत्रित करण्यासाठी छिद्र असल्याचा करण्यात आला आहे दावा-
छिद्रामुळे टोपण उघडणे किंवा लावणे सोपे जाते किंवा त्यासाठी दबाव नियंत्रित राहतो हे थोडं ना पटणारं आहे. कारण बऱ्याच कंपन्या टोपणाला बाजूने पण छिद्र ठेवतात ज्यामुळे दबावाचा प्रश्न मिटतो. त्यामुळे वायूचा दाब व्यवस्थित ठेवणे यामागचा उद्देश मुळीच नाही.

काय आहे खरं कारण?
टोपणाला असणाऱ्या छिद्रामागे असण्याचे मुख्य कारण म्हणजे पेनाला टोपण लावल्यानंतर आपल्याला चघळायची सवय असते तेव्हा ते चुकून गिळले जाऊन त्यामुळे गुदमरल्या (सफोगेशन) सारख होऊ नये. सर्वात जुनी आणि लोकप्रिय कंपनी बीआयसी क्रिस्टल यांनी सर्वात अगोदर हे पेनचे डिझाईन तयार केले होते ज्यामध्ये टोपणाला छिद्र ठेवण्यात आले होते.

त्यांनी हे डिझाईन बनवताना एक कॉमन गोष्ट लक्षात घेतली की बऱ्याच जणांना पेनाचे टोपण चघळत बसायची सवय असते. त्यामुळे ते झाकण कधी कोणी चुकून गिळले तर त्यातून हवा जावी व गुदमरू नये हा त्या छिद्रामागचा उद्देश आहे. खरेच आहे, आपल्याला सर्वाना पेनाचे टोपण तोंडात टाकायला खूप आवडते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *