वादग्रस्त विधानामुळे बाहेर गेलेल्या पांड्याच्या या कॅचने मैदान गाजवले! बघा व्हिडीओ..

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानामुळे हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्या कार्यक्रमातील विधानामुळे त्याला आणि सलामीवीर लोकेश राहुल यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करताना हे प्रकरण न्यायालयात गेले होते.

न्यायालयातील निकाल येईपर्यंत पांड्या व राहुल यांना खेळण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पांड्याचा न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघात समावेश करण्यात आला. पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात पांड्याने मैदान गाजवत दमदार पुनरागमन केले आहे.

भारतीय संघाने हा सामना सात विकेट्स राखत सहज जिंकला. हा सामना जिंकत भारताने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडने भारतासमोर २४३ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने ३ विकेट्स गमावत हे आव्हान सहज पार केले. भारताकडून रोहित शर्मा ६२ आणि कर्णधार विराट कोहलीला ६० धावांची खेळी केली. तर अंबाती रायडू नाबाद ४० आणि दिनेश कार्तिकने नाबाद ३८ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी आज हार्दिक पांड्यावर सर्वांच्या नजरा होत्या. निलंबनानंतर त्याचा हा पहिला सामना होता. पांड्याने दमदार कामगिरी करत सर्वाना खुश केले. त्याने गोलंदाजीतही चांगले योगदान दिले. १० ओव्हरमध्ये ४५ धावा देत २ विकेट्स घेतल्या.

याशिवाय मैदानावर आज पांड्याने घेतलेल्या कॅचची हवा होती. केन विलियम्सन आणि रॉस ट्रेलर हि जोडी टिकेल असे वाटत असताना पांड्याच्या अफलातून कॅचने त्याचा अडथळा दूर केला. १७ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर केनने मारलेला हा फटका मिडविकेटला उभ्या असलेल्या पांड्याने अप्रतिमरित्या टिपला आणि केनला माघारी परतावे लागले. पांड्या डाव्याबाजूला पुर्णपणे हवेत झेपावला होता. पांड्याच्या या अप्रतिम झेलमुळे केन बाद झाला आणि कोहली खुश झाला.

केन विलियम्सन हा टिकला असता तर भारताला मोठे आव्हान मिळाले असते. एकप्रकारे हा कॅच मॅच जिंकवणारा ठरला म्हणलं तरी चालेल.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *