अमितच्या लग्नातील राज ठाकरेंचं लकी नंबरचं हे गणित ठरवून जुळवलं कि निव्वळ योगायोग?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे आज विवाहबंधनात अडकले आहेत. सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत अमित आणि मितालीचा लग्नसोहळा पार पडला आहे. यावेळी अनेक दिग्गज मान्यवर मंडळीनी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली होती.

राज ठाकरेंची सुनबाई प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ संजय बोरुडे यांची मुलगी मिताली आहे. अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात झालंय. ठाकरे कुटुंबात तब्बल २८ वर्षानंतर सनई चौघडे वाजले आहेत. लग्नसमारंभात राज, उद्धव आणि जयदेव ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं बघायला मिळालं.

या लग्नाबाबत अजून एक गोष्ट खास बघायला मिळाली. ती म्हणजे या लग्नाचा वेळ आणि तारीख. राज ठाकरेंनी अमितच्या लग्नात आपल्या लकी नंबरचं गणित जुळवलं आहे. मग हा निव्वळ योगायोग आहे कि त्यांनी ठरवून जुळवलं हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

काय आहे लकी नंबरचं गणित?

राज ठाकरेंचा ९ हा लकी नंबर आहे. त्यांचं या नंबरवरचं प्रेम वारंवार दिसून आलं आहे. पण अमित ठाकरेंच्या लग्नाच्या निम्मिताने त्यांनी पुन्हा एकदा आपलं ९ नंबरवरच प्रेम दाखवून दिलं आहे.

राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापणा करण्यासाठी जी तारीख निवडली होती ती देखील ९ मार्च २००६ होती. याशिवाय राज ठाकरेंच्या गाडीचा नंबरसुद्धा ९ आहे.

लग्नाच्या तारीख आणि वेळेची बेरीज करून देखील हे ९ चं गणित जुळलंय. अमित यांच्या लग्नाची तारीख हि २७ आहे. यात २ आणि ७ ची बेरीज ९ होते. याशिवाय लग्नाचा वेळ आहे १२ वाजून ५१ मिनिट होता. वेळेच्या ४ अंकाची बेरीज केली असता ती देखील १+२+५+१=९ होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
बघा कोण आहे राज ठाकरेंची सुनबाई!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *