मच्छरांना घरातून पळवून लावण्याकरिता हि झाडे नक्की घरात ठेवा..

पावसाळा झाला कि मच्छरांचा त्रास वाढतो आणि हे मच्छर रात्रीचा दिवस करतात. या करिता आपण अनेक उपाय करतो उदा. coil किंवा काही प्रायवेट कंपनीने बाजारात आणलेली उत्पादने, आता तर अगरबत्ती सुध्दा आलेली आहे ज्यामुळे मच्छर मरतात परंतु त्या वायूपासून हृद्ययाचे अनेक रोग होतात हे वैज्ञानिकांनी सांगितलेले आहे.

या सर्वापासून नैसर्गिक बचावाची उपाय आज आम्ही तुम्हाला खासरेवर सांगणार आहोत. तर बघूया मच्छर पळविण्या करिता कोणती झाडे उपयोगी पडतात. हे झाडे मच्छर तर पळवणारच सोबत आपल्या बागेची सुंदरता देखील वाढविण्यास मदत करणार हे नक्की आहे.
१. रोजमेरी: हे रोपटे ४-५ फुट लांबीचे असून त्यामुळे मच्छर पळतात. सोबतच या रोपट्यास निळ्या रंगाची सुंदर फुले देखील येतात. सर्दीच्या वातावरणात हे जगत नाही यांना उन्हाची आवश्यकता असते. या झाडास उन्हात ठेवावे.

२. सिट्रोनेला ग्रास: सिट्रोनेला ग्रास हा एक गवताचा प्रकार आहे याची उंची २ मीटर पर्यंत वाढू शकते. आणि याला लॅवेंडर रंगाचे फुले देखील येतात. सिट्रोनेला ऑइल मेणबत्ती, परफ्युम इत्यादी नैसर्गिक उत्पादनात याचा उपयोग होतो. डेंगूवाल्या मच्छरापासून बचावाचे काम हे झाड करते.

३. झेंडू झेंडूच्या झाडापासून येणाऱ्या सुगंधामुळे मच्छर आणि अनेक कीटक दूर राहतात. झेंडूचे अनेक प्रकार आहेत आणि हे सर्व मच्छर दूर ठेवण्याकरिता बचाव करतात. झेंडूच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे हे झाड उन्हात ठेवावे.

४. कैटनिप कैटनीप एक औषधी वनस्पती आहे जी पुदिन्यासारखी दिसायला आहे. हे १२ महिने बहार असणारे रोपटे आहे. याला जास्त उन सहन होत नाही. याला आपल्या गैलरीमध्ये नक्की लावा. सोबतच याचा रस आपल्या त्वचेकरिता देखील गुणकारक आहे.

५. एग्रेटम (ओसाडी) : जंगली पुदिना किंवा ओसाडी या नावाने देखील या रोपट्यास ओळखले जाते. हलक्या निळ्या रंगाचे याला फुल येतात. या झाडत तयार होणारे कौमारिन हे द्रव्य मच्छरांना दूर ठेवते. हे झाड त्वचेवर लावू नये.

६. कडुलिंब कडुलिंबाचा पाला आपण अनेक काळापासून घरात जाळत आलेले आहो त्यामुळे मच्छर येत नाही हे सर्वाना माहिती आहे. कडुलिंबापासून त्वचेचे अनेक रोग तसेच सौंदर्यवर्धक म्हणून देखील उपयोग होतो. कडुलिंब हि बहुगुणी वनस्पती आहे.

७.लैवेंडर: मच्छर दूर ठेवणे आणि घरातील बगीच्याची शान वाढविण्याकरिता लैवेंडर एकदम बेस्ट वनस्पती आहे. ४ फुटापर्यंत वाढणाऱ्या या रोपास उन्हाची आवश्यकता असते. केमिकल फ्री मच्छर पळविण्याच्या औषधात याचा जास्त वापर केला जातो. आपल्या बसण्याच्या ठिकाणी हे रोपटे लावावे.

८. तुळस: तुळस प्रत्येक घरात असावीच असे जुने लोक सांगतात कारण सर्वाना माहिती आहे तुळस २४ तास ऑक्सिजन देते त्यामुळे हिंदू धर्मात तुळसीला महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. तुळस मच्छर दूर ठेवण्याकरिता देखील उपयोगी आहे. त्वचेवर तुळसीचा पाला घासून आपण शांत झोप घेऊ शकता. त्यामुळेचे अनेक लोक तूळशीचे पान कानात ठेवतात.

९. लेमन बाम: लेमन बाम हि पुदिन्याचा एक प्रकार आहे. अनेक मच्छर पळविण्याच्या औषधात याचा उपयोग होतो. लेमन बाम मध्ये ३८% सिट्रोनेला आढळतो त्यामुळे मच्छर दूर राहतात. हे पान आपल्या शरीरावर चोळून आपण निवांत झोप घेऊ शकता.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *