बघा कोण आहे राज ठाकरेंची सुनबाई!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे आज विवाहबंधनात अडकले आहेत. सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत अमित आणि मितालीचा लग्नसोहळा पार पडला आहे. यावेळी अनेक दिग्गज मान्यवर मंडळीनी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली होती.

याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, उद्योगपती रतन टाटा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, जयदेव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, प्रसिद्ध गायिका आशा भोसले, अभिनेता अमिर खान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

खासरेवर जाणून घेऊया कोण आहे राज ठाकरेंची सुनबाई-

राज ठाकरेंची सुनबाई प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ संजय बोरुडे यांची मुलगी मिताली आहे. अमित यांचे शिक्षण आर. ए. पोद्दार महाविद्यालयातुन तर मिताली यांचे शिक्षण रुईया महाविद्यालयातुन झाले आहे.

अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात होतंय. मिताली या मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या आहेत. मिताली फॅशन डिझायनर आहे. शिवाय ती उर्वशी राज ठाकरे यांच्याबरोबरही काम करते. या दोघींनी मिळून जुडवा टू या चित्रपटासाठी काम केलंय. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

अमित यांचे शिक्षण आर. ए. पोद्दार महाविद्यालयातुन तर मिताली यांचे शिक्षण रुईया महाविद्यालयातुन झाले. तेथेच त्यांची ओळख झाली व या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आज ते विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांची खूप जुनी मैत्री होती पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि आता विवाहबंधनात झालं आहे. अमित ठाकरे हे सध्या राजकारणापासून अलिप्त आहेत. ठाकरे घराण्यात बऱ्याच दिवसानंतर सनईचौघडा वाजल्या आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *