भाई येतोय! बघा सलमान खान च्या बहुप्रतिक्षीत ‘भारत’चा टीझर..

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्य सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघतात. मागील काही सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन बघता सलमान खान शाहरुख खान यांच्या सिनेमांना म्हणावं तसं यश मिळालं नाहीये.

सलमान खानचा बहुप्रतीक्षित ‘भारत’ सिनेमाचा टीझर आज रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये सलमानच्या वेगळवेगळ्या झलक पाहायला मिळत आहेत. लहान मुलापासून वृद्ध व्यक्ती असा सलमानचा प्रवास टीझरमध्ये दिसत आहे.

अली अब्बास जाफर दिग्दर्शित ‘भारत’ सिनेमाची चाहत्यांना प्रतीक्षा होती. चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच आज (25 जानेवारी) चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.

टीझरची सुरुवात भारत-पाकिस्तान फाळणीच्या दृश्यांपासून येते. पहिल्या सीनमध्ये लोक ट्रेनवर बसून आपला देश सोडत असल्याच्या दृश्यावरुन भारताच्या फाळणीचं चित्र स्पष्ट होतं. एका डायलॉगने सलमान खानची एन्ट्री होते. “लोक मला कायम माझं नाव आणि जात विचारत असत. म्हणून वडिलांनी माझं नाव भारत ठेवलं. आता नावाच्या पुढे जात लावून आपल्या देशाचा मान-सन्मान कसा काय कमी करु शकतो?”

सिनेमात सलमान खानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. पण टीझरमध्ये ती दिसत नाही. यासोबतच दिशा पटानीही सिनेमात दिसणार आहे. यावर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. टीझर पाहिल्यानंतर आता चित्रपटाच्या कथेबबत उत्सुकता आहे.

पाहा टीझर

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *