“एका मताने काय फरक पडतो?” नक्की वाचा एका मताचे महत्व सांगणारे प्रसंग..

भरतील सर्व नागरिकांना सर्वात महत्वाचा अधिकारी म्हणजे मतदानाचा अधिकार हा आहे. परंतु अनेक लोक मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस मानतात आणि या अधिकाराची कदर करत नाही. आज खासरेवर काही असे क्षण बघूया जिथे एका मतामुळे सत्तापालट झालेले आहे.

२००९ लोकसभेला भारतात ५८.१९ टक्के मतदान झाले आणी २०१४ लोकसभेला ६६.३८ टक्के एवढे मतदान झाले. अनेक लोक म्हणतात एका मताने काय फरक पडतो आता बघूया खरच एक मत किती महत्वाचे,
१. अविश्वास प्रस्ताव लोकसभा १९९९
१९९९ ला वाजपेयी सरकार बहुमत विश्वास प्रस्ताव जिंकण्या करिता फक्त १ मताने दूर राहिली होती. ज्या नंतर सरकारला फक्त १३ महिने पायउतार व्हावे लागले होते.

२. कर्नाटक विधान सभा निवडणूक २००४
जनता दलाचे के.के.आर कृष्णमूर्ती यांनी कॉंग्रेसचे उमेदवार आर.ध्रुवनारायण यांचा पराभव फक्त एका मतांनी केला होता. कृष्णमुर्ती यांना ४०७५२ तर ध्रुवनारयण यांना ४०,७५१ एवढे मतदान झाले होते.

३. राजस्थान विधानसभा २००८
तत्कालीन कॉंग्रेस प्रदेशअध्यक्ष सीपी जोशी हे बीजेपीच्या कल्याण सिंह चौहान फक्त एका मताने पराभूत झाले होते. सीपी जोशी यांना ६२,२१५ मत आणि चौहान यांना ६२,२१६ असे मत होते.

४.मुबई महानगर पालिका निवडणूक २०१४
मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेचे अतुल बगलकर आणि बीजेपीचे उमेदवार अतुल शहा दोघांनाही ५९४६ असे सारखेच मत मिळाले होते. त्यानंतर निघालेल्या ईश्वरचिट्ठी मध्ये शहा विजय झाले.

लोकसभा निवडणुकीस फक्त २ महिने बाकी आहे आजच विचार करून घ्या १ मताने काय फरक पडतो तर.. आणि आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा..
आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज नक्की लाईक करा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *