हे होते बाळासाहेबांचे शेवटचे शब्द…

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बाळासाहेब ठाकरे यांची धगधगता निखारा म्हणून ओळख होती. त्यांना आपण शिवसेनाप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट म्हणूनही ओळखतो. बाळासाहेब ठाकरे यांचे वयाच्या 86 व्या वर्षी मातोश्रीवर अखेरचा श्वास घेतला. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3 वाजून 33 मिनिटांनी निधन झाले होते. बाळासाहेबांच्या निधनामुळे समस्त महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

बाळासाहेब निधन होण्यापूर्वी त्यांचे शेवटचे शब्द त्यांची सेवा करणारा थापा याच्याशी बोलले होते. थापा हा एकप्रकारे बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईतच होता. 27 वर्षांपूर्वी मुंबईत आलेला थापा हे भांडूपमधील तत्कालीन नगरसेवक दिवंगत के टी थापा यांच्यामुळे बाळासाहेबांचे सेवक म्हणून रुजू झाले.

थापा हा बाळासाहेबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबतच होता. बाळासाहेब त्याला पुत्रवत प्रेम करायचे. मीनाताई ठाकरेनंतर थापा यानेच बाळासाहेबांची काळजी घेतली. शेवटच्या श्वासापर्यंत थापा हा बाळासाहेबांची सावली बनून राहिला

बाळासाहेबांना त्यांच्या शेवटच्या दिवसात आजाराने घेरलं होतं. त्यांच्या निधनापूर्वी बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते. एक दिवस त्यांची प्रकृती जास्तच खालावली होती. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने त्यांना एक खास इंजेक्शन दिले. ज्यामुळे त्यांची प्रकृती थोडी सुधारायला लागली होती. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आशेचा किरण तयार झाला होता.

थापा बाळासाहेबांसोबतच होता. बाळासाहेबांनो त्यांचे शेवटचे शब्द थापालाच बोलले आणि त्यानंतर त्यांची तब्येत जास्तच खालावली. बाळासाहेब थापाला नाजूक आवाजात म्हणाले, ‘ थापा मी आरती करायला जातोय’. आणि हेच शब्द बाळासाहेबांचे शेवटचे शब्द ठरले. यानंतरच्या 48 तासातच बाळासाहेबांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

थापा बाळासाहेबांच्या गोळ्याऔषधी पासून रोजचे सर्व काम करत असे. थापा हा असा माणूस होता ज्याला बाळासाहेबांच्या खोलीत कधीही प्रवेशास परवानगी होती. तो ठाकरे कुटुंबियांना कुटूंबातील एक सदस्य असल्या सारखाच होता. बाळासाहेब यांनी शेवटची इच्छाही उद्धव याना सांगताना थापाला कायम मातोश्रीवर ठेवण्यास सांगितले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *