प्रियांका गांधीकडे असलेली हि गाडी म्हणजे रस्त्यावर धावणारा हत्ती! बघा काय आहे असे या गाडीमध्ये..

प्रियांका गांधी यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच त्यांना काँग्रेसचे सरचिटणीस पद देण्यात आलं आहे. यासोबतच प्रियांका गांधींनी अधिकृतरित्या सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. त्या या पूर्वी सक्रिय राजकारणात नसल्या तरी त्यांचे राजकारणातील वजन कमालीचे होते.

सक्रीय राजकारणात उतरलेल्या प्रियांका गांधी यांची कालपासून देशभर चर्चा सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साह निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशसह देशभर त्यांचा झंझावात बघायला मिळणार आहे.

यापूर्वी प्रियांका गांधी कोणत्याही पदाशिवाय पडद्यामागे काँग्रेससाठी काम करत होत्या. निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. तसंच महत्त्वाच्या रणनीतीही आखत होत्या. पण त्या आता अधिकृतपणे राजकारणात आल्याचे देशभर प्रचार करताना बघायला मिळतील.

निवडणूक प्रचारात प्रियांका गांधी सर्वात जास्त कोणत्या गाडीचा वापर करतात माहिती आहे का?

प्रियांका गांधी यांच्याकडे एकूण ५ गाड्या आहेत. पण या पाच गाड्यांपैकी त्यांची आवडीची गाडी म्हणजे टाटा सफारी आहे. त्या येत्या निवडणुकीत प्रचारासाठी हीच गाडी वापरतील असे बोलले जात आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे टाटा सफारीसह फोर्ड, जॅग्युआर, टोयोटा फॉर्च्यूनर अशा एकूण पाच गाड्या आहेत.

काय आहे त्यांच्या आवडत्या सफारीचे वैशिष्ट्य-

प्रियांका गांधी या मोठ्या राजकीय कुटुंबातून येतात. गांधी कुटुंबांना एसपीजी सुरक्षा देण्यात येते. त्यामुळे त्यांच्या गाडयांना विशेष प्रकारे बनवण्यात येते. त्यांची टाटा सफारी अत्याधुनिक फीचर सोबत बनवलेली आहे. या गाडीच्या चारही बाजुने एनआयजे लेवलचे ३ बीपी प्रोटेक्शन ग्लास लावले आहेत. आर्म्ड टाटा सफारीत ५ एग्झिट दरवाजे आहेत.

या गाडीचे आणखी एक खासियत म्हणजे या गाडीवर हँड ग्रेनेड फेकला तरी या गाडीचे काहीही नुकसान होत नाही. या गाडीला १५० किलोमीटर ताशी वेग आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *