हिमालयातील योगींच्या अद्भुत शक्तींनी मोठेमोठे शास्त्रज्ञ झाले आहेत थक्क…

आपल्याला अनेक प्राचीन घटनांमुळे माहिती आहे की विविध क्रियाच्या निरंतर प्रयत्नाने मनुष्य असाधारण शक्ती मिळवण्याचे सामर्थ्य ठेवतो. या घटनांवर आधारित अनेक असे किस्से आजही आपल्या साहित्यात उपलब्ध आहेत, परंतु अनेकांसाठी त्या फक्त काल्पनिक गोष्टी वाटतात. हिमालय आणि तेथील योगिंच्याअद्भुत चमत्कारिक शक्तींनी शास्त्रज्ञांचे ध्यान सुद्धा आकर्षित केले आहे.

प्रोफेसर हर्बर्ट बेंसन यांच्या नेतृत्वाखाली हार्वर्ड स्कुल ऑफ मेडिसिन च्या संशोधक रहस्यमय पर्वतांचा पर्दाफाश करण्यासाठी हिमालयाकडे मार्गक्रमण केलं. खरंतर ही घटना 20 वर्षांपूर्वीची आहे पण यामुळे काय झालं ते खूपच थक्क करणारे आहे.

एवढेच नाही तर या शास्त्रज्ञांच्या निष्कर्षाने हिंदू धर्म आणि बौद्ध धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता यावरून विवाद ही निर्माण केला होता. परंतु अन्य धर्मासारखे या दोन धर्माच्या महानतेवर बोलणे अयोग्यच आहे. हिंदू धर्मामुळे बौद्ध धर्माची निर्मिती झाली असे बोलतात. पण पश्चिमी देशात यावर वेगळाच दृष्टिकोन आहे. खासरेवर पूर्ण घटना वाचा आणि तुमच्या विचाराविषयी आम्हाला कळवा. यावर तुमचे काय मत आहे?

सिक्कीम मध्ये शास्त्रज्ञांनी अमानवी गुणांना प्रदर्शित करताना भिक्षूंना पाहिले. प्रगत साधना दरम्यान भिक्षूंच्या शरीराचे तापमान एवढे अधिक होते की त्यांच्या अनुयायांनि ओल्या चादरीने त्यांना गुंडाळून टाकले होते. भिक्षूंच्या शरीरानं आगीने पेट घेऊ नये म्हणून त्यांचे अनुयायी असे करत. ए

काग्रता आणि श्वास घेण्याच्या कलेच्या माध्यमातून हे भिक्षु आपल्या शरीरातील चयापचय दर 64% कमी करायचे ज्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान खूप वाढायचं. तरीसुद्धा भिक्षूंना 15000 फूट उंचीवर हिमालयातील अतिशय थंडीत जिवंत राहणे खूप साधारण गोष्ट आहे.

भिक्षूंच्या या असाधारण शक्तींचा अभ्यास करण्यासाठी हार्वर्डच्या टीमने उत्तर भारतातील एका मठात काही तिबेटी साधूंना एका खोलीत बसवले, जिथले तापमान जवळपास 40 डिग्री फारेनहाइट होते. नंतर एक विशिष्ट योग प्रकार ‘जी-तुम-मो’ च्या मदतीने भिक्षूंचा खोल ध्यानात पाठवले. त्यानंतर थंड पाणी (49 डिग्री) मध्ये भिजलेले कपडे साधकाच्या खांद्यावर ठेवले गेले.

या परिस्थितीत शरीराचे तापमान घटल्याने मृत्यू निश्चित आहे. पण काहीच क्षणात कपड्यातून भाप निघायला सुरुवात झाली. ध्यानच्या दरम्यान भिक्षूंनी आपल्या शरीराचे तापमान एवढे वाढवले की भिललेले कपडे एक तासात सुकले.

आता प्रश्न हा आहे की भिक्षु असे का करतात? कोणी हे का करेल?

हर्बर्ट बेंसन जे की 20 वर्षापासून ‘जी-तुम-मो’ चा अभ्यास करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की ‘बुद्धिष्ठांना वाटते की आपण मनुष्य ज्या वास्तविकतेत जगत आहोत, ती खऱ्या वास्तविकतेपेक्षा वेगळी आहे. एक अशी गोष्ट आहे जी आपल्या भावनांनी अप्रभावीत आहे. आपले दैनंदिन जीवन ते ओळखण्यास असमर्थ आहे. त्यांचे मत आहे की मनाची अशी अवस्था दुसऱ्यांचे कल्याण आणि धान्याने प्राप्त केली जाऊ शकते. ध्याना दरम्यान उत्पन्न ऊर्जा ‘जी-तुम-मो’ प्रकारची फक्त एक उपउत्पादन आहे.

काय होऊ शकतो फायदा?

बेंसन पूर्णपणे मानतात की ध्यानाच्या या उन्नत रुपी अभ्यासाने स्वतःच्या क्षमताविषयी चांगल्या प्रकारे जाणले जाऊ शकते. एवढेच नाही तर यामुळे ताण-तणाव संबंधित आजारांपासून सुद्धा सुटका मिळवता येते. शरीराच्या स्वास्थ्याचे अनुमान त्याच्या मेटाबॉलीज्म दरात कमी उत्पन्न करणे, श्वास घेण्याचा दर आणि रक्तदाबाच्या विशेषतः वर अवलंबून असते. असे केल्याने मनुष्य जास्त दिवस जगू शकतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *