कांद्याच्या सरणावर आत्महत्या केलेला हा बळीराजा कोण आणि काय होते कारण? नक्की वाचा

शेतकरी आत्म्हत्येच सत्र थांबत नाही आहे. कांद्याचे भाव पडल्यामुळे काल परत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. कांद्याच्या बाजूला पडलेला त्याचा मृतदेह हलवून टाकणारा होता. परंतु हा युवक कोण या बद्दल अनेकांना माहिती नाही किंवा त्याच्यावर अशी का वेळ आली या मागची गोष्ट आज खासरे वर बघूया,

तर या फोटोतील शेतकरी ज्ञानेश्वर दशरथ शिवणकर (वय २५) आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने निराश होऊन मालेगाव तालुक्यातील कंधाने येथील या शेतकऱ्याने शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली. शिवणकर कुटुंबाकडे कडे ६ एकर शेती होती. त्याच्या हिस्स्यावर १ एकर जमीन आहे आणि बाकी शेती आई वडील बघतात. मागील वर्षी त्याने १.५ लाख कर्ज उचलले परंतु या अगोदर वेळेवर कर्ज परत केल्याने त्याला कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही.

त्याच्या शेतात कांदा लावला परंतु पाण्या अभावी जसा पाहिजे तसा कांदा आला नाही. ३० क्विटल कांदा हातात आला परंतु सध्याच्या बाजारभावामुळे मुद्दल परत येईल का नाही याची त्याला चिंता होती. पिकवलेल्या सोन्याची माती झाली आपण पिकवलेल्या मालाचा खर्चही निघत नाही,हे दुर्दैव आहे ज्ञानेश्वर सारखीच व्यथा अनेक शेतकऱ्यांची असून अनेक शेतकऱ्यांना आपला कांदा फेकून द्यावा लागत आहे.

शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली. कांद्यासाठी जेवढा उत्पादन खर्च आला तेवढा खर्चही न वसूल झाल्याने शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला. त्याच्या पाठीमागे २ भाऊ, पत्नी , आई वडील आणि २ मुली असा परिवार आहे. कांद्याच्या ढिगाऱ्यावर त्याने विष प्रश्न केले आणि या जगाचा निरोप घेतला. सधन समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची इतकी वाईट अवस्था होत असेल,तर दुष्काळग्रस्त भागातील बळीराजाचे काय?

मन सुन्न करणारी हि घटना आहे. ज्ञानेश्वर शिवणकर यांच्या कुटुंबांबद्दल कोणास माहिती असेल तर आमच्या सोबत नक्की शेअर करा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *