भैय्यूजी महाराजांचा अश्लील व्हिडीओ बनवणारी पलक कोण आहे?

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात रोज रोज नवीन खुलासे होत आहेत. भय्यूजी महाराजांना आत्महत्या करण्यासाठी प्रवत्त करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन विनायक आणि शरद यांचा होता.

धक्कादायक बाब म्हणजे पलक पुराणिकने महाराजांचा अश्लील व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ बाहेर देण्याच्या धमक्या देऊन हि तरुणी महाराजांवर लग्नासाठी दबाव टाकत होती. १ वर्षात लग्न करण्याचा अल्टिमेटम तिने महाराजांना दिला होता. त्याची मुदत १६ जूनला संपणार होती. त्याआधीच १२ जून रोजी भय्यू महाराजांनी आत्महत्या केली.

कोण होती पलक-

भय्यू महाराजांची पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर पलक केअर टेकर म्हणून त्यांच्या घरात आली होती. महाराजांच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांच्या एकटेपणाचा फायदा तिने घेतला. महाराजांना तिने प्रेमात अडकवले. एवढ्यावरच न थांबता त्यांचा अश्लील व्हिडीओ तिने बनवला. महाराजांसोबत झालेले अश्लील चॅटिंग देखील तिच्याकडे सेव्ह असायचे.

महाराजांनी १७ एप्रिल २०१७ ला आयुषी यांच्यासोबत दुसरे लग्न केले. त्यामुळे पलकने देखील महाराजांना लग्न करण्याचा तगादा लावला. एवढ्यावरच ना थांबता तिने थेट एक वर्षाचा अल्टिमेटमच त्यांना दिला. विनायक आणि शरद यांच्या मदतीने पलक महाजरांकडून महिन्याला दीड लाख रुपये सुद्धा घ्यायची.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन विनायक आणि शरद यांचा होता. यासाठी त्यांनी पलकचा वापर करुन घेतला. विनायक महाराजांवर दबाव टाकण्याचे काम करत असे. पलक तुमच्यावर शोषणाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे, असे ते महाराजांना सांगत असायचे.

एवढ्यावरच न थांबता विनायक आणि पलक महाराजांना अशक्त होणाऱ्या गोळ्या देत असल्याचे समोर आले आहे. भय्यू महाराज यांच्या दुसऱ्या विवाहाच्या आधी विनायक आणि शरद यांनी पलक व महराजांच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करत त्यांचे अश्लील चॅट देखील मिळवले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *