RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी काही अपरिचित माहिती…

जगातले सर्वात मोठे संगठन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे हे सर्वाना परिचित आहे. संघ शिस्त आणि अनुशासन याकरिता प्रसिध्द आहे. परंतु संघाविषयी बरीच माहिती आजही अनेकांना नाही. त्यामुळे आज आरएसएस विषयी काही खासरे माहिती बघूया..

१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ २०२५ मध्ये १०० वर्ष पूर्ण करणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली डॉक्टर हेडगेवार यांनी दसऱ्याच्या दिवशी केली होती.
२. आरएसएसचे मुख्यालय नागपूर महाराष्ट्र येथे आहे. सद्या संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आहेत. संघाचे सर्व सरसंघचालक ब्राम्हण असतात. मोहन भागवत भारतातील फार कमी लोकांना देण्यात आलेली झेड+ सिक्युरिटी देण्यात आली आहे.

३. ३० जानेवारी १९४८ रोजी बिर्ला भवन, दिल्ली येथे सायंकाळी ५:१० ला नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची गोळी झाडून हत्या केली. तेव्हा आरएसएसचे नाव सर्वासमोर आले. गोडसे आरएसएसचे सदस्य आहे सांगण्यात आली. यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी आणली जी १९४९ साली हटविण्यात आली.

४. आरएसएसची पहिली शाखा ५ लोकापासून सुरु झाली होती. आज संपूर्ण भारतात संघाच्या ६०,००० शाखा आहेत आणि किमान १०० स्वयंसेवक एका शाखेत असतात.
५. आरएसएसमध्ये महिलांना प्रवेश नाही याचे कारण संघाद्वारे स्वतंत्र राष्ट्रीय सेविका समिती चालविल्या जाते. संघ आणि समिती दोनीही वेगवेगळ्या आहे परंतु दोघाचेही विचार एकच आहे.

६. आरएसएसचे वर्ग शाखा नावाने भरतात सकाळी प्रभात शाखा आणि सायंकाळी सायं शाखा या स्वरुपात हे वर्ग असतात. आठवड्यात एक किंवा दोन वेळेस भरणाऱ्या वर्गास मिलन शाखा म्हणतात. महिन्यात एक किंवा दोन वेळेस भरणाऱ्या वर्गास संघ मंडली म्हणतात.
७. संघाच्या शाखेच्या समारोप हा नमस्ते सदा वत्सले हे गीत म्हणून होते. संघाच्या स्थापनेच्या १५ वर्षानंतर हे गीत बनविण्यात आले होते.त्या अगोदर हिंदी आणि मराठी श्लोक म्हटल्या जात होते.

८. १९६२च्या भारत चीन युद्धात आरएसएसने सैन्यास मदत केली त्यामुळे नेहरू यांनी आरएसएसला स्वतंत्रता दिवस संचलनात आमंत्रित केले. आरएसएस नेहमी देश विदेशात नैसर्गिक संकटात लोकांना मदत करते.

पहिली शाखा भरली ते नागपूर येथील मैदान

९. आरएसएसचा सदस्य कुठल्याही पदावर गेल्यास त्याला ओळखायचे असल्यास तो स्वतःचे काम स्वतः करतो जसे कपडे धुणे स्वयंपाक करणे इत्यादि.
१०. आरएसएसच्या प्रचाराकास त्याच्या प्रचार काळात अविवाहित असणे बंधनकारक आहे. आणि दुसरे असतात विस्तारक जे लग्न करू शकतात.विस्तारक संघात नवीन मुलांना जोडायचे काम करतात.

११. संघाचा प्रचारक होण्याकरिता स्वयंसेवकास तीन वर्ष OTC ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प पूर्ण करावा लागतो. आणि शाखा प्रमुख होण्याकरिता ITC इन्स्पेक्टर ट्रेनिंग कॅम्प पूर्ण करावा लागतो.
१२. आरएसएस ने सन २००२ पासून मुस्लीम राष्ट्रीय मंच देखील सुरु केला आहे. ज्यामध्ये मुस्लीम काम करतात. १०,००० मुस्लीम या मंचात काम करतात.

१३. बीजेपी नेता अटल बिहारी वाजपेयी, लाल कृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदि हे देखील संघाचे प्रचारक होते.
१४. आरएसएस चा स्वतःचा वेगळा झेंडा आहे भगवा जो प्रत्येक शाखेत फडकविल्या जातो. संघाचा प्रत्येक स्वयंसेवक या ध्वजास गुरु मानतात.
१५. आरएसएसच्या शाखा फक्त भारतातच नाहीतर इतर ४० देशात देखील आहे. संघाची पहिली शाखा मोंबासा केनिया येथे लागली होती.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *