आता घुमणार बाळासाहेबांचा तोच आवाज ! नवीन आवाजातील ठाकरे चित्रपटाचा ट्रेलर बघितला का?

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा खर्जातला आवाज ऐकून अख्खं शिवाजी पार्क उसळायचं. कारण, त्या आवाजात जरब होती, दम होता, वेगळीच जादू होती. बाळासाहेबांच्या आवाज हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवायचा.

बाळासाहेबांच्या भाषणाला लोकं दुरून दुरून येऊन गर्दी करायचे. बाळासाहेबांना ऐकणं हि अनेकांसाठी पर्वणी असायची. अक्षरशः त्यांचं भाषण ऐकताना अंगावर शहारे यायचे.

बाळासाहेब ठाकरे यांचं आयुष्यावर येत असलेल्या ठाकरे चित्रपटात देखील तीच जादू पुन्हा बघायला मिळेल अशी अनेकांची आशा होती. पण मराठीतील ठाकरे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यातील बाळासाहेबांचा आवाज कुणालाही आवडला नाही. अनेकांनी त्यावर नेटवरून टीका देखील केली.

ठाकरे ट्रेलरमधल्या इतर सर्व गोष्टी प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. त्यातील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गेट-अपचं, त्याच्या अभिनयाचं भरभरून कौतुक होतंय. सगळे प्रसंग आणि डायलॉग सैनिकांच्या मनावर शहारा आणणारे आहेत. पण मराठी ट्रेलरमधील बाळासाहेबांचा आवाज हि एकच गोष्ट फारशी कुणालाच आवडलेली नाही.

बाळासाहेबांसाठी अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज वापरण्यात आला होता. ट्रेलर रिलीज झाल्यापासून बाळासाहेबांना बाळासाहेबांचाच आवाज असायला हवी, अशी तीव्र इच्छा नेटकरी व्यक्त करत होते.

नेटकऱ्यांची इच्छा पूर्ण झाली-

नेटकऱ्यांच्या मागणीची दखल निर्माते आणि दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटात बाळासाहेबांचा आवाज बदलला आहे. आता बाळासाहेबांसारखा अंगावर शहारे आणणारा आवाज चित्रपटातून बघायला मिळणार आहे.

नेटिझन्सच्या इच्छेनुसार आवाजाचे जादुगार, प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट चेतन शशितल यांच्याकडून बाळासाहेबांचा आवाज डब करून घेण्यात आला आहे.

बघा ठाकरेचा नवीन ट्रेलर-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

1 comment

  1. झकास एकदम ,आता खरी मजा अली “जय महाराष्ट्र” ?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *