पिढ्यानपीढ्या आरोपींना फासावर लटकवायचे काम करणारे, भारतातील प्रसिद्ध जल्लाद कुटुंब…

भारतात गुन्हेगारांना सर्वात मोठी शिक्षा ही फाशी आहे. कायदेशीर प्रक्रियेमुळे फाशी होण्यास विलंब लागतो परंतु ज्या लोकांना फाशी झाली आहे. त्यांना फासावर चढवायचे काम पिढ्यान पिढ्या एक कुटुंब करत आहे.

उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील पवन जल्लाद यांचे कुटूंब पिढ्यान पिढ्या आरोपींना फासावर लटकवायचे काम करत आहे. आज खासरेवर बघुया या जल्लाद कुटुंबाविषयी…

४ पिढ्यापासुन आरोपींना फासावर लटकावयचे काम पवन जल्लाद यांचे कुटूंब करत आहे. आरोपी रंगा बिल्ला, इंदिरा गांधी यांचे मारेकरी सतवंत सिंग व केसर सिंग यांना फाशी पवन जल्लाद याच्या आजोबा कल्लु सिंग यांनी दिली होती. त्याच्या पंजोबानी इंग्रजाच्या काळात भगतसिंग यांना फाशी दिली होती याचे दुख: आजही पवन यांना होते.

पवन जल्लाद यांचे आजोबा कल्लु सिंह हे भारतातील नावाजलेले जल्लाद होते. त्यांना संपुर्ण भारतात फाशी देण्याकरीता बोलावल्या जात. त्यांच्या आजोबा सारखा फाशीचा दोर कोनिही बनवु शकत नाही असे ते सांगतात. यानंतर पवन यांचे वडील मम्मु जल्लाद यांनी १२ आरोपिंना फासावर चढवले होते.

मम्मु सिंह देखील फाशिची दोर बनविण्याकरीता प्रसिध्द होते. पवन याने फाशीचा दोर बनवीने व फाशिचा प्लॅटफॅार्म तयार करणे आजोबा कडुन शिकला आहे. त्याने लहानपनापासुन अनेक आरोपिंना फासावर चढताना बधितले आहे.

पवनला या कामाकरीता सरकारतर्फे फक्त तिन हजार रुपये महिना मिळतो. परंतु हे पैसे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरीता पुरेसे नसल्यामुळे तो सायकलने कपडे सुध्दा विकतो. पवनला दोन मुले व एक मुलगा आहे. पवन जल्लाद याचे कुटूंब मेरठ येथील भगवानपुरा भागात एका छोट्याश्या घरात राहते. त्यांची पत्नी बबली म्हनते की आरोपिंना फाशी देण्यात मला काही वाईट वाटत नाही. त्याचे सासरची मंडळी देखील हाच व्यवसाय करतात. भविष्यात येणाऱ्या पिढ्या हाच व्यवसाय करतील असा पवन सांगतो.

पवन जल्लाद यांना निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली याची फाशी रद्द झाली याचे खुप दुख होते, त्याने या फाशिची संपुर्ण तयारी केली होती व न्यायालयाने ४ दिवसा अगोदर फाशी रद्द केली. कोली यांने अनेक बालकावर बलात्कार करुन त्यांचे मास भाजुन खाल्ले होते. पवन म्हनतात देवाने त्यांना पापी लोकांना दंड देण्याकरीता निवडलेले आहे त्यामुळे ते हे काम खुशीने करतात. पवन जल्लाद साईबाबा भक्त आहे. फाशि देण्या अगोदर पवन जल्लाद देवाची पुजा करुन हे काम करतो.

ही माहीती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *