या कारणामुळेच धोनी धोनी आहे! डावपेच आखण्यामध्ये महेंद्रसिंह धोनीला तोडच नाही..

नुकतेच या सिरीजमध्ये धोनी थकलाय अशी टीका धोनीवर चालू झाली होती. पहिल्या सामन्यातील त्याच्या संथ खेळीमुळे तर त्याच्यावर जास्तच टीकेची झोड उठली होती. पण दुसऱ्या सामन्यात खेळलेल्या मॅच विनिंग पारीमुळे त्याने टीकाकारांचे तोंड बंद केले होते. धोनीने आपण आजही मॅच फिनिशर असल्याचे मागच्या सामन्यात दाखवून दिले होते.

धोनी या शिवाय त्याच्या मैदानातील डावपेचांसाठी देखील सर्वाना माहिती आहे. पण खेळाडू फॉर्ममध्ये नसल्यावर डावपेच फसत असतात. मात्र आज चालू असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात धोनीच्या एका डावपेचामुळे तो अजूनही तरबेज असल्याचे दिसून येत आहे.

धोनीने आज एक असा डावपेच आखला ज्यात ऑस्ट्रोलियाचा कर्णधार अडकला आणि बाद झाला. सामन्यात कोणता प्लेयर काय करेल हे धोनी बरोबर हरतो. धोनी सध्या कर्णधार नसला तरी तो कर्णधार असल्यासारखं काही निर्णय मैदानात घेत असतो. आणि खेळाडूंना मार्गदर्शन करतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्‍वर कुमारने ऍरॉन फिंचचा मालिकेत तिसऱ्यांदा अडथळा दूर केला. पण या सामान्यामध्ये धोनीचा ‘सल्ला’ मोलाचा ठरला.

भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील नवव्या षटकात भुवनेश्‍वर गोलंदाजी करत होता. पहिले पाच चेंडू निर्धाव होते. फिंच क्रीझच्या पुढे येऊन खेळत होता. हे धोनीने अचूक टिपले. त्यामुळे त्याने भुवनेश्‍वरला सल्ला दिला, की चेंडू आता क्रीझच्या मागून टाक!

नवव्या षटकातील शेवटचा चेंडू भुवनेश्‍वरने पंचाच्याही मागून टाकला. आश्‍चर्यचकित झालेल्या पंचांनी हा चेंडू ‘डेड’ ठरविला. पण इथेच धोनीने आपल्या डावपेचात विजय मिळवला होता. कारण भुवनेश्वरच्या या बॉलमुळे फिंच गोंधळला. आणि पुढच्या चेंडूवर भुवनेश्‍वरने फिंचला पायचीत केले.

ऑस्ट्रोलिया या सामन्यात भारतासमोर २३१ धावांचे लक्ष ठेवले आहे. भारताने या धावांचा पाठलाग करताना ३३ ओव्हरमध्ये ३ बाद १२३ धावा केल्या आहेत.

बघाच धोनीने कसे अडकवले फिंचला-
फिंच गोंधळला तो बॉल-

बाद झाला तो बॉल-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *