भारतीय लष्कराचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक! बघा पाकिस्तानचं काय काय उडवलं..

सर्जिकल स्ट्राइक्स ही काही साधी, सोपी गोष्ट नाही. हा हल्ला शत्रूच्या क्षेत्रात घुसून केला जातो. म्हणूनच यात नुकसान होण्याची भीती अधिक असते. त्यासाठी खूप मोठी तयारी आणि अचूक नियोजनाची गरज असते आणि लष्कराच्या स्पेशल फोर्सचे पॅराकमांडोज् ही कामगिरी पार पाडतात. भारताने यापूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता.

लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाने (मिलिटरी इंटेलिजन्स) यासाठी विशेष घेतलेली असते. एखादे ऑपरेशन म्हणजेच ‘सर्जरी’. ज्या प्रकारे संपूर्ण शरीरावर न करता एखाद्या विशिष्ट भागावरच केली जाते, त्या प्रमाणेच ही सर्जिकल स्ट्राइकही अचूकरित्या विशिष्ट भागावरच करण्यात येते.

भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर नुकताच उरी- सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालत असतानाच आता भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

पाकीस्तानचं काय काय उडवलं?

जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय लष्कराने आज पाकिस्तानी सैन्यावर मोठी कारवाई केली आहे. एकप्रकारे हा दुसरा सर्जिकल स्ट्राईकच होता म्हणलं तरी चालेल. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान केले आहे.

या स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या 5 जवानांना ठार करण्यात आलं असून पाकचे अनेक बंकर्सही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतरची भारतीय लष्कराने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे याला गेल्या काही दिवसांतील मोठा स्ट्राईक असेही म्हटले जात आहे.

पाकिस्तानकडून सीमारेषेवर सुरु असलेल्या नेहमीच्या कुरापतींना भारताने याद्वारे उत्तर दिले आहे.सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रीसंधीचे वारंवार उल्लंघन होत होते. पाकच्या या पुळचट कारवायांना भारतीय लष्कराने चांगलेच प्रत्युत्तर दिले. पुंछ आणि राजौरी क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पाच रेंजर्संना कंठस्नान घातले.

यासोबतच पाकचे 12 बंकर्सही उद्धवस्त केले आहेत, याबाबत लष्करी कारवाईचे अधिकारी रणबीर सिंग यांनी माहिती दिली. तसेच पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास इंडियन आर्मी नेहमीच तयार आहे, असेही सिंग यांनी म्हटले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *