माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरून नजारा कसा दिसतो बघा व्हिडीओ…

माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सगरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.

माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून (अंदाजे २५ हजार डॉलर प्रत्येकी) हे शिखर सर करण्याचा प्रयत्‍न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी के२ अथवा कांचनगंगा ह्या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे.

इतर कोणत्याही ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत, तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. या शिखरावर पहिली चढाई १९५३ मध्ये ब्रिटिश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर आजवर २,४३६ गिर्यारोहकांकडून ३,६७९ चढाया झाल्या आहेत.

तर आज खासरेवर बघा कसा दिसतो माउंट एवरेस्ट वरून जगाचा नजारा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *