स्‍त्री असो की पुरुष, थायलंडला जात असाल तर या 10 गोष्‍टींकडे अवश्‍य लक्ष असू द्या

पर्यटकांसाठी सर्वात आकर्षक स्‍थळ म्‍हणजे थायलंड. येथील जीवन शैली आणि नैसर्गिक सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालते. यामुळेच भारतातूनही मोठ्या संख्‍येने पर्यटक थायलंडला जातात. हा दक्षिण-पुर्व आशियातील एक देश आहे. याच्‍या जवळपासय कंबोडिया, मलेशिया आणि म्‍यानमार असे देश आहेत. बँकाक ही थायलँडची राजधानी आहे. येथे फिरण्‍यासाठी बँकाक, पटाया, फुकेट, अयूथया ऐतिहासिक उद्यान, चियांग माई, नखेन पथोम खास असे अनेक स्‍थळ आहेत.

जगभरातील लोकांचा भूतावर विश्वास आहे. असाच काही प्रकार थायलंडमध्ये आहे येथील नागरिक भूतासाठी एक छोटेसे घर आपल्या घरासमोर बनवितात. येथील शाही परिवाराचा अपमान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. हे केल्यास तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते हा नियम पर्यटकाना लागू आहे. थायलंडमद्ये अनेक रेड लाईट एरिया आहेत त्यामुळे थायलंड हे जगप्रसिध्द आहे.

थायलंडमध्ये ९५% लोक हे बौध्द आहेत. बौध्दलोक कपाळास पवित्र मानतात म्हणून कपाळास कोणाच्याही हात लावू नये. थायलंडमध्ये रामकीन हा महाग्रंथ आहे हा रामायणचे थाई वर्जन आहे. थायलंडचा अर्थ होतो फ्री लैंड याला पहिले सियाम देश म्हणून ओळखल्या जात असे.

येथील लोक आपल्या राणी राजस देवाप्रमाणे पूजतात त्यांचा अपमान त्यांना सहन होत नाही. धर्म आणि राज्यशासन हे थायलंडचे प्रमुख दोन स्तंभ आहे येथे भगवे कपडे घातलेले भिक्खू आढळतात व सोने आणि दगडाने बनविलेल्या मुर्त्या दिसतात.

थायलंडच्या मंदिरात जाण्या अगोदर कपड्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते छोटे कपडे घालून मंदिरास प्रवेश नसतो. थायलंडची राजधानी बैन्कोक हे जगातील सर्वात उष्म शहर आहे येथे सर्वात उष्म महिना एप्रिलमध्ये सोन्गक्र्ण हा सन होळी सारखा साजरा केला जातो. यामध्ये केवळ पाण्याचा वापर केला जातो.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *