पाच सहा दशकापासून अविरत ऊन वारा पाऊस न जुमानता मुंबईला जोडणारी ही लाल परी…

आठवणींचा भला मोठा साठा आपल्या उरात मिरवत, जिथे माणसाला सुद्धा निट चालता येणार नाही, अश्या रस्त्यातून दिमाखात धावणाऱ्या बस मधून प्रवास करण्याची एक वेगळीच मजा होती…

मला अजूनही आठवते आहे एक वेळ होती जेव्हा माझे वडील स्वतः एक डबल-डेकर बस मधेय कंडक्टर होते सुट्टीच्या दिवशी बसच्या वरच्या माळ्यावर सगळ्यात पुढच्या खिडकीत बसून मजा घेणारा मी , ते दिवस कधीच विसरू शकत नाही.

शाळा-कॉलेज साठी यातून सफर करणारा क्वचितच असा एखादा असेल ज्याची कहाणी इथे सुरू होऊन, इथेच संपली नसेल.खरतर BEST म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय, जगावा असा वाटणारा…

बॉम्बे ट्रामवे कंपनी आणि मुंबई नगरपालिका यांमध्ये “बॉम्बे ट्रामवे १८७४” नावाचा करार झाला. त्यानुसार कंपनीला घोड्यांनी ओढायच्या ट्राम चालवण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर १९०५ मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवेज कंपनी लिमिटेड हिने बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेतली आणि मुंबईच्या रस्त्यांवरून विजेवर चालणार्‍या ट्राम धावू लागल्या व नंतर जास्त गर्दी होत असल्याने १९२० मध्ये डबलडेकर ट्राम चालवायला सुरुवात केली.

बेस्ट ची पहिली बस १५ जुलै १९२६ मध्ये अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली. मुंबईकरांनी या सेवेचे जोरदार स्वागत केले.

सरकार आणि महानगरपालिका यांच्या विनंतीवरून बेस्ट ने उत्तर मुंबईत आपली सेवा सुरू केली.दुसर्‍या महायुद्धानंतर ७ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी “बेस्ट” मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली कालांतराने बॉम्बे चे मुंबई झाले म्हणून “बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट” च नाव बदलून “बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट” असे ठेवण्यात आले.

हाच तो काळ होता जेव्हा मुंबईत लाखो मराठी तरुणांचे कैवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ऐन जोमात होते. त्यांचे ते धगधगते नेतृत्व ज्वलंत पणा ती दहशत आणि मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी लढण्याची जिद्द सगळ्यांना प्रेरणा देणारी होतीच पण त्यांनी त्याचा वापर हुबेहूब केला . अनेक बेरोजगार मराठी तरुण जीवाची मुंबई करण्यासाठी मुंबईत आले त्यावेळी शिवसेना ह्या संघटनेने त्यांना तारले उभे केले हक्क मिळवून दिला. आणि आज त्याच संघटनेला मराठी माणसाचा विसर पडलाय का ??

असो राजकारण हा वेगळा विषय पण राहून राहून तीच गोष्ट येते ९०% कामगार मराठी आणि त्यातल्या त्यात दक्षिण मध्य मुंबईत लालबाग परळ भोईवाडा ह्या सारख्या कर्मचारी वसाहतीमधेय राहणाऱ्या ह्या मराठी मतदारांच्या जीवावर निवडून येणारे सर्वपक्षीय खासदार आमदार नगरसेवक काय करतायत ??? पूर्वीची बाळासाहेबांची पुण्याई म्हणून मराठी माणूस तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे त्यात मी सुद्धा आहेच म्हणा पण त्याच BEST वर आज ही वेळ आली आहे ह्या सारखे दुर्दैव अजून कोणतेच नाही .

आणि हो Ac मधेय बसून बैठक करणारे आणि मराठी मतांचे राजकारण करणाऱ्यांनो एक दिवस त्या गर्दीत बस चालवून दाखवा नाहीतर 2 तास उभा राहून घंटी मारून दाखवा बस्स मानला तुम्हाला मग…..आणि हो तुम्ही मुंबईकर सुद्धा जर BEST नाही वाचली ना तर त्याला आमच्या प्रमाणे तुम्ही देखील तितकेच जबाबदार असाल . बघा जमतंय का नाहीतर आहे पुन्हा तेच ५ वर्षांनी तिच घोषणाबाजी वायदे आणि त्यांचे फायदे.

खूप काही आहे बोलण्यासारखा पण तूर्तास पुरे.#just_woke_up

-तुषार गोरे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *