मुलायम सिंघ यादव यांच्या मुलाची आणि सुनाची प्यारवाली लव्हस्टोरी

अखिलेश यादव आणि डिंपल यांच्‍याशिवाय यादव परिवारात आणखी एक Love Couple आहे. डिम्पल आणि अखिलेश बद्दल सर्वांना माहिती आहे कारण दोघेही राजकारणात सक्रीय आहेत परंतु या दोघा बद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. आज खासरेवर आपण बघूया प्रतिक आणि अर्पणा यांच्या खास लव्हस्टोरी बद्दल काही खासरे माहिती

मागे अपर्णा यादव यांचे नाव घुमर गाण्यामुळे प्रसिद्धीत आले होते कारण त्यांनी आपल्या भावाच्या साखरपुड्यात पद्मावतीचा वेश पेहराव करून घुमर गाण्यावर ठेका धरला होता. आणि करणी सेनेनी याचा विरोध केला होता. करणी सेनेचे लोकेंद्रसिंह कल्वी यांनी म्हटले, राजपूत कुटुंबात जन्मलेल्या मुलायमसिंह यांच्या सूनबाई अपर्णा यांनी राजपुतांच्या भावना लक्षात घ्याव्यात.

राजस्थानी गाण्यावर नाचण्याची इतकी हौस असेल तर आम्ही त्यांना मूळ घुमर व इतर राजस्थानी लोकगीते पाठवून देऊ असा सल्लाही दिला. या दरम्यान, काही लाेकांनी अपर्णा यांना सोशल मीडियावरून धमक्याही दिल्या होत्या.

मुलायम यांचा लहान मुलगा प्रतीक आणि अपर्णा यांची लव्‍ह स्‍टोरी हायस्‍कुलपासून सुरू झाली. अपर्णा, प्रतीकच्‍या बॉडीमुळे इंप्रेस होती. ब्रिटनच्‍या एका वृत्‍तपत्राला माहिती देताना अपर्णाने सांगितले होते, 8 वर्षांपासून आमची मैत्री आहे. त्‍यामुळे तुम्‍ही आम्‍हाला हायस्‍कुल स्‍विटहार्ट्स असेही म्‍हणू शकता.

लग्‍नात आले होते अमिताभ-जयासह इतर सेलेब्‍स-

8 वर्षाच्‍या मैत्रीनंतर सप्‍टेंबर 2010 मध्‍ये प्रतीक-अपर्णाचे लग्‍न ठरले. नोव्‍हेंबर 2011 मध्‍ये ही जोडी विवाहबद्ध झाली. या लग्‍नात अमिताभ-जया बच्चन, अनिल अंबानी यांच्‍यासह इतरही सेलेब्‍स होते. सध्‍या दोघांना प्रथमा नावाची एक मुलगीही आहे. अपर्णा मॅनचेस्टर यूनिवर्सिटीतून इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्‍ये P.‍G. आहे. प्रतीक यांनी लीड्स यूनिवर्सिटीतून मॅनेजमेंटची पदवी मिळवली.

प्रतीकच्‍या बॉडीवर इंप्रेस झाली होती अपर्णा=

10 व्‍या वर्गात अपर्णा आणि प्रतिक यांचे प्रेम जुळले. एका मुलाखतील त्‍यांनी या बाबीचा खुलासा केला होता. 1988 जन्‍मलेले प्रतिक बॉडी बिल्डर आहेत. त्‍यांचे मित्र सांगतात की अपर्णा प्रतीकच्‍या बॉडीवर इंप्रेस झाली होती.

दोघांचे छंद वेगवेगळे

प्रतीक यादव रिअल इस्टेट व्यवसाय सांभाळत बॉडी बिल्डिंगचा छंद जोपासतात. लखनौमध्‍ये त्‍यांनी नुकताच ‘आयरन कोर’ नावाचा जिम उघडला आहे. तर, अपर्णाला गायनाची आवड आहे. गायनासह त्‍या ‘बी-अवेयर’ नावाची सामाजिक संस्‍थाही चालवतात.

ह्या जोडीस खासरे कडून भरपूर शुभेच्छा आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *